Posts

खरा आदर व महत्व

 खरा आदर व महत्व गुहेमध्ये सिंह झोपला असताना, एक उंदीर इकडे तिकडे उड्या मारत होता.  त्याच्या आवाजाने सिंहाला जाग आली व त्याने त्या उंदराला पंजात पकडले. उंदीर थरथर कापू लागला. त्याने सिंहाला विनंती केली, "मला सोडून द्या. मला जेव्हा व जशी जमेल, तशी मी तुम्हाला मदत करेन."  उंदीराचे हे बोलणे ऐकून सिंह खदाखदा हसू लागला. आणि "तू काय मला मदत करणार?" असे बोलून त्याने उंदराला सोडून दिले.  काही दिवसांनी जंगलामध्ये शिकार्‍यांनी दोरीचा सापळा रचला होता. रात्री सिंह त्यात अचानक अडकला व जोराने डरकाळी फोडून लागला.  इतक्यात तिथे उंदीर आला व त्याने सिंहाची अवस्था बघितली. शिकारी यायला वेळ होता. सकाळपर्यंत तरी शिकारी येणार नव्हते. उंदीर सिंहाकडे बघून परत निघून गेला, पण सिंहाला त्याचे काहीच वाटले नाही.  थोड्या वेळाने उंदीर परत आला, तेव्हा त्याच्याबरोबर त्याचे कुटुंबीय व मित्रमंडळी होती.  त्या सर्वांनी आता शिकार्‍यांनी लावलेल्या दोऱ्यांच्या सापळ्यातील, दोऱ्या कुरतडायला सुरुवात केली. हळूहळू एक एक करत, जेव्हा त्यांनी तीन-चार दोऱ्या कुरतडतल्या, तेव्हा सापळा ढिला झाला व सिंह त्...

मैत्री: नाण्याच्या दोन बाजू

मैत्री: नाण्याच्या दोन बाजू!            चालण्याचा व्यायाम (walk) करताना, मी एखाददुसऱ्या ठिकाणी थांबतो. कालही थांबलो होतो. बाजूला चार अमराठी तरुण गप्पा मारत होते. आजूबाजूला इतरांच्या कानावर आपले शब्द पडतील, यांची तमा न बाळगता बोलत होते. एका मित्राच्या बाबतीत चर्चा होती. उर्वरित तिघांपैकी, एक जण त्याच्या बाजूने बोलत होता; तर दुसरा वेगळे मत नोंदवत होता. तिसरा कसलीही फिकीर न करता, मोबाईलमध्ये बहुधा गेम खेळत होता. ज्या मित्राच्या बाबतीत बोलणे सुरु होते, एक जण त्याला समजावत होता की, तू तुझ्या गर्लफ्रेंडला आयुष्यात करिअरमध्ये पुढे जाऊ देत नाहीस, हे योग्य नाही. तर दुसरा बाजू घेऊन बडबडत होता, जर तिने प्रगती केली तर, त्या मुलीचे आई-वडील तिचे लग्न तोलामोलाच्या मुलाबरोबर करुन देतील आणि हा मित्र बाजूला राहील.  ज्याच्याबद्दल ती चर्चा सुरु होती, त्याचे मत सुद्धा तेच होते, 'तिने प्रगती केली तर, हा बाजूला पडू शकतो.' ही चिंता त्याला सतावत होती, म्हणून तो आपल्या खास मैत्रिणीला जमेल त्या प्रकारे, प्रगतीच्या मार्गावरुन मागे खेचत होता. चौथ्या मित्राला विचारलं असता, त्याने स...

डर के आगे जीत हैं..

Image
  _ डर के आगे जीत हैं.. _ * भिती व चिंता, यांच्यामध्ये खूप फरक आहे. * _ प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत जोशी यांच्या शब्दात _ , * भिती म्हणजे संकटाची प्रतिक्रिया * व * चिंता म्हणजे समोर नसलेल्या संकटाची अपेक्षा.... * _ एखादा मोठा भुंकणारा कुत्रा समोर आला तर, भिती वाटू शकते. कारण तो भुंकणारा मोठा कुत्रा समोर आहे. _ _ परंतु काही जण या भुंकणाऱ्या मोठ्या कुत्र्याला सुद्धा घाबरत नाहीत. _ _ याउलट काही जण, केवळ 'कुत्र्यापासून सावधान' हे पाटी बघून, किंवा कुत्र्यांचा दुरुन येणारा आवाज ऐकून सुद्धा घाबरतात. _ _ * कुत्रा समोर आल्यानंतर, त्या संकटाची प्रतिक्रिया म्हणून जी भावना निर्माण होते, ते भिती! * * पण समोर कुठेही कुत्रा दिसत नसताना सुद्धा, जी भावना मनामध्ये निर्माण होते ती चिंता! * चिंता करणारी माणसं आपलं आयुष्य स्वतःहून व्यर्थ घालवत असतात. कारण बहुतांशी वेळा, ज्या गोष्टीची वा बाबींची अथवा घटनांची चिंता वाटत असते, ज्या कारणामुळे चिंता वाटत असते, तसं काहीच घडत नाही. ही चिंता फोल ठरते. पण मग त्यामुळे चिंता करणाऱ्यांच्या आयुष्यात किती नुकसान होत असेल, त्याचा विचार चिं...

परीसाचा दगड मिळाला काय?

Image
 जागते रहो.. सावध रहा... एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.  त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा; असा त्याचा दिनक्रम सुरु झाला. दिवस गेले, महिने लोटले.. वर्षे सरली.. पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही. दगड घ्यायचा,साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा..   शेवटी तो माणूस म्हातारा झाला...  आणि ज्या क्षणी, तो आपले शेवटचे श्वास मोजत होता.. त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले, ती साखळी सोन्याची झाली होती... दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा.. या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही..  तात्पर्य :-प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो...  कधी आई- वडिलांच्या रुपाने, तर कधी भाऊ-बहिणीच्या नात्याने..  तर कधी मित्राच्या वा मैत्रिणीच्या नात्याने ...  तर कधी जवळच्या नात्याने....  कोणत्या ना कोणत्या रुपात, तो आपल्याला भेटत असतो...  आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो......  आपण जे काही असतो किवा बनतो, त्यात त्यांचा बराच हातभार असतो .........

कृतज्ञता: जादूचा दिवा

Image
 अनेक ज्ञात-अज्ञात मान्यवरांच्या कृतज्ञतेविषयक विचारांनी भारावलेला हा लेख आहे. कृतज्ञतापूर्वक आपणांसमोर सादर करत आहे. तुम्ही करु शकता, अशा सर्वात चांगल्या आध्यात्मिक गोष्टींपैकी एक, म्हणजे स्वतः माणुसकी स्विकारणे. माणुसकी असणारी व्यक्ती, इतरांचे आभार मानते. धन्यवाद देते. 'धन्यवाद!' हा सर्वोत्तम प्रभावी शब्दांपैकी एक आहे, जो कोणीही म्हणू शकतो.  मी हा प्रभावी शब्द नेहमी वापरत असतो. रेस्टॉरंट मध्ये खाणे वाढणारा वेटर असो वा टेबल साफ करणारा मुलगा असो, रिक्षा/टॅक्सी ड्रायव्हर असो वा रस्त्यात समोरासमोर आल्यावर, प्रथम मला जाऊ देणारी व्यक्ती असो, वा छोटीमोठी मदत करणारी कोणतीही व्यक्ती असो.. 'धन्यवाद' हे प्रभावी शब्द तोंडातून आपसूकच बाहेर येतात. 'धन्यवाद म्हणणे', आपल्यातील, नम्रता व समजूतदारपणा व्यक्त करते. आभार मानणे, ही कृतज्ञतेची सुरुवात आहे. कृतज्ञता म्हणजे आभार व्यक्त करण्याची पूर्णता. आभार व्यक्त करताना, केवळ शब्द असू शकतात.  कृतज्ञता कृत्यांमध्ये दर्शविली जाते. कित्येकदा, धन्यवाद बोललास ना, झाले तर.. असा दृष्टिकोन निर्माण होऊ शकतो. पण, खरी कृतज्ञता ही कृतींमधूनच व्...

ही कोण?

 "काय रे, कोण?" एका संध्याकाळी रात्री घरी परत येत असताना वाटेत थांबून मोठ्या भावाच्या मित्राने प्रश्न विचारला.  मला कळले नाही. मी विचारले, "कोण?"  तेव्हा त्याने डोळे मिचकावत विचारले, "अरे, स्टेशनवर दररोज अर्धा एक तास गप्पा मारत असतोस, ती कोण?"  मी सहज उत्तर दिले, "मैत्रीण आहे!"  त्यावर त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवून दबक्या आवाजात विचारले, "बिपिन, अशी कोणती ही मैत्रीण आहे, जिच्या बरोबर तुझ्या इतक्या गप्पा रंगतात? मी शांतपणे सांगितले, "माझे असे मित्र सुद्धा आहेत आणि अजून मैत्रिणी सुद्धा आहेत; त्यांच्यासोबत माझे विचार जुळतात, आवडी-निवडी जुळतात आणि मग त्यांच्याशी मी तासन-तास गप्पा मारू शकतो. हो, आणि स्टेशन वर सुद्धा!" मोठ्या भावाचा मित्र खांदे उडवत जाताना म्हणाला, "आम्ही फक्त बसल्यावरच (🥃), आमच्या गप्पा रंगतात.." मूलभूत स्त्री पुरुष मैत्रिणीकडे बघण्याचा दृष्टिकोन कुठेतरी वेगळा होताच, पण आता तो एका बाजूने अधिक मलिन होत चालला आहे. तर दुसऱ्या बाजूने तो दृष्टिकोन सुदृढ दृष्ट्या स्वच्छ होत चालला आहे. तरी, निकोप दृष्टिकोन असणाऱ...

मैत्रीत राजकारण नको, राजकारणात मैत्री करा.

 . . "मैत्रीत राजकारण नको. राजकारणात मैत्री करा." राजकीय सल्लागार' होण्यासाठी ज्यांनी मला मार्गदर्शन केले, त्यांनी मला हा सल्ला दिला होता. आज जवळच्या नात्यांमध्ये मित्र-मैत्रिणी मध्ये राजकारणातील स्वतःच्या मतांबद्दल अट्टाहास धरला जात आहे; दुराग्रह केला जात आहे. कित्येकदा हे पक्षीय राजकारण असतं, तर कधी धर्माचं किंवा जातीचं राजकारण असतं.. लहानपणी, आम्हां मित्रमैत्रिणींना, 'जात' माहित नव्हती; 'धर्म' चर्चेत नव्हता. आज चित्र थोडेफार का होईना, बदलत चालले आहे. आज, लहानपणी ज्यांनी घट्ट मैत्रीमध्ये, जातीधर्माचा विचार केला नव्हता, त्याच मित्रमैत्रिणींमध्ये, जातीनुसार किंवा अहंकाराच्या पार्श्वभूमीवर ग्रुप्स बनत गेले आहेत. तर इतर सामाजिक मित्रमैत्रिणींमध्ये, आपापल्या धर्मावरुन (केवळ हिंदू नव्हे) आग्रही भूमिका घेणे, सुरु झाले आहे. यावर, वॉट्सॲप युनिव्हर्सिटी व राजकारणाची गडद छाप जाणवते.  मैत्रीमध्ये राजकीय पक्षांच्या धोरणांचे पडसाद उमटत आहेत. आज आबालवृद्ध सर्वांनीच विचार करायला हवा, की आपण जी मते सोशल मिडियामध्ये व्यक्त करता, त्यांचा आपल्याकडे स्वतःचा तर्कशुद्ध आधार आह...

कोळी, जिद्द आणि तुम्ही..!

 जाळं विणताना, कोळी सहा वेळा खाली पडला.. अयशस्वी झाला.. पण सातव्यांदा, त्या कोळ्याने परत झेप घेतली व आपले जाळे पूर्ण केले. ते प्रत्येक अयशस्वी प्रयत्न पाहत, कोळ्याबरोबर, स्वतःला सहानुभूती देत असलेला, स्कॉटलंडचा रॉबर्ट द ब्रूस, कोळ्याचा सातवा यशस्वी प्रयत्न पाहून अचंबित झाला. तो स्वतः सहा वेळा, क्रांतीचा सहा वेळा अयशस्वी प्रयत्न करुन निराश बसला होता. पण, त्या एवढ्याशा छोट्या कोळ्याने, त्याला जिद्द-चिकाटी शिकवली व रॉबर्ट द ब्रूस, परत सज्ज झाला. तुम्ही काय करत आहात? प्रयत्न सोडून, आहे ते मान्य करुन, गप्प बसला आहात? दिवस ढकलत आहात? की, तुमच्या जिद्द व चिकाटीने, प्रयत्न करत आहात? चला, होऊ या प्रसन्न! बिपिन मयेकर लेखक

निरागसपणा, कितपत असावा?

Image
आमच्या कुटुंबाची पालकत्वाच्या नात्याने काळजी घेणारे, माझे वरिष्ठ मित्र, यांनी हल्लीच निरागसतेवरुन मस्करी केली. मी हसत हसत उत्तर दिले, "मी निरागस नाही." माझ्या पत्नीने नंतर विचारले, "तुम्ही असं कशासाठी बोललात?" माझ्या मते, 'निरागस म्हणजे ज्याला काही कळत नाही.. याउलट, मला Subconscious Mind Reader म्हणून समोरच्या व्यक्तीचे हेतू व भावना समजतात. म्हणून मी निरागस नाही. हो, पण, मी समोरील व्यक्तीच्या मनातील ओळखले, तरी मी त्याचा कधीच फायदा घेतला नाही, उलट काही वेळा माझा फायदा घेऊ दिला. पण, त्याची जबाबदारी माझीच होती व आहे. ते माझे निर्णय होते व ती माझी प्राथमिकता होती. आपल्या निर्णयांना व प्राथमिकतांना, आपणच जबाबदार असतो.  माझ्या आयुष्यावर, अनेक मोठ्या व्यक्तींचा प्रभाव आहे. माझ्या एका प्रभावी व आवडत्या लेखकांनी (आज ते हयात नाहीत), त्यांच्या वडिलांबद्दल सांगितले होते. "त्यांच्या वडिलांना, अनेक जण फसवत होते. एकदा, वडिलांच्या मित्राने विचारले, इतके जण, तुमचा हवा तेव्हा, हवा तसा फायदा घेतात. त्यातील काही जण तुम्हाला फसवतात, तुम्हाला वाईट नाही वाटत? वडिलांनी उत्तर दिले,...

स्त्री_पुरुष

 माझी मते: काही वर्षांपूर्वी, मी जिन्यावरुन धावत खाली प्लॅटफॉर्मवर येऊन, नुकतीच सुरु झालेली ट्रेन पकडली. थोडा श्वास घेतल्यानंतर, लक्षात आले की, मी महिलांच्या बाजूच्या डब्यात होतो. मध्येच जी जाळी होती, तिथे काही पुरुष बांधव आपल्या डोळ्यांचे कॅमेरे लावून उभे होते. महत्वाची बाब म्हणजे, तो रक्षाबंधनाचा दिवस होता. बहुतेक सर्वांच्या हातावर राखी बांधलेली होती. मी दरवाजाजवळ उभा राहिलो. उतरणाऱ्या कॅमेरा लावून बघणाऱ्या पुरुषांबद्दल एक अपेक्षा होती की, त्यांची बहीण बाजूच्या डब्यात होती, म्हणून ते काळजीपोटी तेथे उभे होते. पण मी उतरेपर्यंत, एकाही पुरुषाला बाजूच्या डब्यातील मुलगी वा स्त्री भेटली नाही. याचा अर्थ, सर्व पुरुष असे आहेत व कोणतीही मुलगी अथवा स्त्री, अशी नाही; असा होत नाही. यातही आता स्पर्धा सुरु झाली आहे. अर्थात अजून तरी पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. मी नाशिक येथे 'महाराष्ट्र पोलीस' दलातील अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण घ्यायला गेलो होतो, तेव्हा दोन तरुण महिला ट्रेनर्स मला भेटायला आल्या होत्या. थोड्या गप्पा झाल्यानंतर, त्यांनी मला एक प्रश्न विचारला, "सर, sex म्हणताच तुमच्या मनात कोणत...

कस्तुरीमृग

कस्तुरीमृग  कस्तुरीमृगाकडे, स्वतःकडे कस्तुरी (आत्यंतिक सुगंधी पदार्थ) असतो; पण त्याला स्वतःला त्याची जाणीव नसते. आपल्या माणसांमध्ये सुद्धा अशा कस्तुरीमृग असलेल्या व्यक्ती असतात.  जेव्हा एखादी व्यक्ती, स्वतःमध्ये असलेली क्षमता, गुण, कौशल्य व त्यांच्यामुळे आयुष्यात मिळू शकणारे प्रचंड लाभ व होणारे स्वहित ओळखू शकत नाही; तेव्हा ती व्यक्ती कस्तुरी मृगासारखीच असते. कस्तुरीमृग भितीमुळे लपून राहतात. माणसांतील अशा व्यक्ती स्वतः निर्माण केलेल्या भितीच्या आवरणात दडून बसतात.  त्यामुळे त्यांची, स्वतःच्या गुणवत्तेच्या अज्ञानामुळे व भितीच्या दडपणाखाली, चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाढते. यातूनच, त्यांच्या आयुष्याला चुकीची दिशा मिळते व आयुष्याचे गणित चुकत जाते. शांतपणे, आता, तुम्ही जे आयुष्य जगत आहात, त्यात तुमच्याकडे असलेल्या क्षमतेचा, गुणांचा व कौशल्यांचा; खरोखरच योग्य फायदा मिळतो आहे काय, याचा विचार करा. विश्लेषण करा.  जर, तुमची योग्यता जास्त असेल, तर तुमच्या योग्यतेला, (आर्थिक व कार्यक्षमता) न्याय देणाऱ्या संधी शोधा. पण संयम ठेवा. सातत्य ठेवा. जिद्द व चिकाटी ठेवा. यश तुमचेच असेल...

व्हॅलेंटाईन डे/आठवडा

Image
  प्रेम  काल चालतानाचा अनुभव: नेहमीप्रमाणे संध्याकाळी सांगण्यासाठी गेलो असताना, एका ठराविक ठिकाणी, जिथे तरुण वर्ग बसून गप्पा मारत असतात, तिथे थोड्या अंतरावरुन लक्ष गेले. तीन टिनेजर मित्र, (साधारण सतरा-अठरा वयाचे असावेत) एकत्र बसून जोरजोरात हसत खिदळत होते. त्यांचा हास्यकल्लोळ मला लांबून ऐकू येत होता व त्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य दिसत होते. इतक्यात दुसऱ्या बाजूने, त्यांच्याच वयाचे जोडपे येताना दिसले. त्यांच्यापाठोपाठ दुसरे जोडपे होते. त्या तरुण मुला-मुलींना एकत्र पाहून या तीन मित्रांच्या चेहर्‍यावरचे हास्य मावळले. ती मुले शांत झालेली दिसत होती. मी जेव्हा त्यांच्या बाजूने पास झालो तेव्हा त्यांच्याशी चर्चा सुरू होती, "काय यार, आज आपल्या प्रत्येकाबरोबर कुणीच मुलगी नाही." पण, त्याअगोदर माझ्या बाजूने जे टिनेजर जोडपे निघून गेले, त्यांच्यात वादविवाद सुरु होता. त्याला अहंकाराची झालर असावी, दोघांच्याही कडून.. दुसरे जोडपे पास झाले; तेव्हा लक्षात आले, यांच्यामध्ये फक्त मैत्री आहे. ती दोघे शांतपणे गप्पा मारत निघून गेले. तिघेही आरामात हसत खेळत होते, परंतु समोरुन जाणार्‍या जोडप्यांना ...

मनातलं

Image
  मनातलं काउंसलिंग सेशन सुरू होते. प्रश्न विचारल्यावर मारियाची मान खाली गेली. तिने जेव्हा मान उचलली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर थोडेसे का होईना, वेगळे हावभाव होते. तिच्या डोळ्यांची किंचित हालचाल झाली.  (नाव बदलले आहे) मी तिला सांगितले, "या प्रश्नाने तुला त्रास होत असेल, तर आपण वेगळ्या विषयाकडे जाऊ या. जेव्हा तुझी मानसिक व भावनिक तयारी असेल, त्यावेळेस आपण या विषयावर पुढील चर्चा करु या." आता मारियाच्या चेहर्‍यावर थोडे आश्चर्याचे भाव होते. तिने घाबरत विचारले, "तुम्हाला कसे समजले?  मी शांतपणे तिला समजावले, "सध्या ते महत्वाचे नाही आपण आपल्या काऊंसलिंग सेशन कडे वळू या." नंतर, प्रत्येक प्रश्नावर, मारियाच्या मनःस्थितीला ओळखत, मी प्रश्नांचा ओघ वळवत राहिलो. मारियाला आता ते समजू लागले होते. सेशन पूर्ण झाल्यावर मारिया शांत व स्थिर झाली होती. तिच्या समस्यांची उत्तरे, तिने शोधून काढली होती. त्या प्रक्रियेत मी फक्त तिला मदत केली होती. निघताना मारिया थोडे पुढे जाऊन, परत थांबली.  मी विचारले, "अजून काही समस्या आहेत काय?" तिने ठामपणे नाही सांगितले, आणि आत्मविश्वासाने मला व...

स्नेहसंमेलन

Image
 *शाळासोबत्यांचे स्नेहसंमेलन* (Reunion) लहान मुले पटकन एकत्र येऊ शकतात, पण मोठ्या माणसांसाठी एकत्र येण्याची प्रक्रिया कठीण असू शकते. कारण वयपरत्वे, प्रत्येकाची स्वतंत्र मनोवृत्ती तयार झाली असते, ज्यातून प्रत्येकजण स्वतःभोवती छोटेमोठे भावनिक कुंपण तयार करुन ठेवतो. हे भावनिक कुंपण मग एकतर समाजात मिसळण्याची क्षमता, कमीजास्त करत जाते. शाळासोबत्यांचे स्नेहसंमेलनामध्ये, सर्व स्वभावाची माणसे एकत्र येतात. यातून प्रत्येकाची, सामाजिक संवेदनशीलता वाढू शकते, जेव्हा अशा प्रकारचे स्नेहसंमेलन, चांगल्या हेतूने व योग्य रितीने, आयोजित केलेले असेल.  फक्त एकमेकांना खूप वर्षांनी भेटण्यापुरते, स्नेहसंमेलन मर्यादित ठेवले, तर पहिल्या एकदोन भेटींनंतर, मनोबंध जुळले नाहीत तर मग बहुतेकांच्या भेटीतील अप्रूप कमी होऊ शकते.  याचे.कारण, जे अगोदरपासून एकमेकांच्या संपर्कात असतात, ते ज्या मनमोकळेपणाने एकमेकांना भेटतात, ते पाहून सामाजिक न्यूनगंड असणाऱ्या मित्रमैत्रिणींची भीड अजून वाढते.  धमाल करत असलेल्या, मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात, शिरण्यापेक्षा मग एकटे बसणे, किंवा आपल्यासारख्या एखाद्यासोबत, टाईमपास ...

आजार, आधार आणि दृष्टिकोन

Image
 आजार, आधार व दृष्टिकोन: भारतामध्ये एखादी व्यक्ती शारीरिक दृष्ट्या आजारी असेल तर त्याची योग्य रीतीने काळजी घेतली जाण्याची शक्यता असते. परंतु एखादी व्यक्ती मानसिक अथवा भावनिक दृष्ट्या आजारी असेल तर मात्र त्याची काळजी घेतली जायची शक्यता कमी होत जाते. कारण बहुतेक वेळा, अनेक जणांची या दृष्टिकोनातून जडणघडण झालेली नसते. माझ्या एका मित्राकडे गेलो असता, त्याचा मुलगा सांगत होता की त्यांच्या शेजाऱ्याचा मुलगा, त्याचा मित्र, खेळायला येताना सोबत चाकू घेऊन येतो. शाळेतील मुलगा चाकू घेऊन येतो, हे ऐकून सर्वांना धक्का बसला. मी मित्राला सुचवले की, तुझ्या शेजारी राहणाऱ्या पालकांनी, त्यांच्या मुलाचे तज्ञ व्यक्तीकडून समुपदेशन करुन घ्यायला हवे. थोड्या दिवसांनी, माझ्या मित्राने कळवले की, समुपदेशनाचा विषय काढताच, (त्याचे शेजारी, जे उच्च विद्याविभूषित आहेत) भडकले.  जर शिकलेल्या व्यक्तींमध्ये गैरसमज असतील,तर अशिक्षित समाजात काय होत असेल? तुमच्या जवळच्या व्यक्तीमध्ये, खालीलपैकी एखादी वा अधिक लक्षणे आढळली तर तुम्हाला त्यांची विशेष सक्रिय काळजी घ्यावी लागते: १. सतत शांत राहणे किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरु...

खोटी प्रशंसा, निंदा व विधायक टिका

Image
 खोटी प्रशंसा, निंदा व विधायक टिका! - बिपीन मयेकर (लेखक) प्रत्येकाला, आपले वागणेबोलणे मान्य असेल किंवा पटेल, हे शक्य नाही. पण, त्यामुळे वाईट वाटून घेण्याचे काहीही कारण नाही. आपण आपल्या शब्दांची व कृतींची कितीही काळजी घेतली, तरी त्याकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन सारखा नसणार. *प्रत्येक जण स्वतःच्या दृष्टिकोनातून, आपल्या वागण्याबोलण्याचा अर्थ लावत असतो.* कित्येक जणांचे व्यक्त होणे, हे खूपच विचित्र किंवा विक्षिप्त असते. काही जणांचा, *अंतस्थ हेतू वेगळा* असतो. काही जण, *आपल्यावरील अतिप्रेमामुळे/आपुलकीमुळे, सत्य परिस्थितीकडे डोळेझाक करत, चुकीची प्रशंसा करतात.* आपण जेव्हा आपल्या अंतस्थ प्रामाणिक हेतू बाबतीत जागरुक असतो, तेव्हा आपल्या हातून खोटी प्रशंसा किंवा निंदा होत नाही.  खोटी/चुकीची प्रशंसा, तुम्हाला चुकीच्या भावविश्वात नेऊ शकते. तुमच्या समोर एक मृगजळ निर्माण करु शकते. *खोट्या/चुकीच्या प्रशंसेमुळे, सत्य व वास्तव परिस्थितीचे आकलन होत नाही. आपण बेसावध होऊ शकतो.* ज्याचा उपयोग विरोधक करु शकतात. माझ्या राजकीय व्याख्यानांमध्ये मी नेहमी सांगतो, *इतर बादशहांकडे खोटी प्रशंसा करणारे, अवत...

श्रीमंत, गरीब व समृद्ध

Image
 श्रीमंत, गरीब व समृद्ध पैसा अत्यंत महत्वाचा आहे. श्रीमंत किंवा समृद्ध, हे कधीच पैशाला नावे ठेवत नाहीत. फक्त गरीब असलेले, कित्येक जण पैशाला नावे ठेवताना दिसतात, कारण पैसा कमवण्याची त्यांची वृत्ती नसते. व्हाट्सअप वर मेसेज फिरत असतात पैसा म्हणजे कागद आहे त्यापेक्षा मित्र जमा करा. खर आहे, मित्रांची आवश्यकता प्रत्येकाला असते. पण पैशाशिवाय आपली जगातील कामे होणार आहेत काय?  काही वेळेला मेसेज असतो, पैशापेक्षा माणुसकी चांगली! हो कधीही! पण केवळ माणुसकीने कित्येक कामे होत नाहीत. त्या माणुसकीला पैशाची जोड असावी लागते. तुमच्या एखाद्या मित्राला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली आणि तुम्ही हॉस्पिटलला सांगितलेत, 'माझ्याकडे खूप माणुसकी आहे. ती जमा करा.' चालेल काय?  मग लक्षात घ्या, पैसा खूप आवश्यक आहे.  फक्त तो किती कमवायचा याच्या मर्यादा आपणच आखून घेतल्या पाहिजेत. त्याबरोबर आपली कर्तबगारी वाढवायला हवी.  पैसा कमावता येत नाही, म्हणून पैशाला नावे ठेवणे चुकीचे आहे.  एकदा दादरमध्ये ग्रीन सिग्नल गाडीला असतानाही, मधून गाडीसमोरुन माणसे जात होती. तेव्हा मी उदगारलो, 'जसे सिग्नल तो...

३. द्वेष: दुसऱ्याला त्रास व्हावा, म्हणून स्वतःच्या हातावर ठेवलेला निखारा

Image
हेवा, मत्सर व द्वेष: मनात लपलेल्या किंवा जोपासलेल्या ३ भावना लेखक: बिपिन मयेकर © भाग ३. द्वेष:  दुसऱ्याला त्रास व्हावा, म्हणून स्वतःच्या हातावर ठेवलेला निखारा! हेवा तात्कालिक असेल तर तो नैसर्गिक भावनेचे प्रतिक असतो. पण हेवा सातत्याने मनामध्ये मुरत राहिला की, त्याचे मत्सरामध्ये रुपांतर होऊ शकते. 'मत्सर' ही नकारात्मक भावना आहे. पण, द्वेष ही पराकोटीची नकारात्मक भावना आहे. 'द्वेष' ही भावना ज्याच्या मनात शिरते, ती त्याचे आयुष्य खाऊन टाकते. 'द्वेष' करणारी व्यक्ती, स्वतःपेक्षा, ज्या व्यक्तीचा द्वेष करत असते, त्याचाच सतत विचार करत राहते. 'द्वेष' करणाऱ्या व्यक्तीचे, स्वतःचे असे आयुष्य शिल्लक राहत नाही. 'द्वेष', ही एखाद्यासाठी (शक्यतो एकदम जवळच्या वा परिचित व्यक्तीप्रती) तीव्र नापसंतपणाची भावना असते.  त्या व्यक्तीस टाळणे, त्याची मुस्कटदाबी करणे, निंदानालस्ती करणे, त्याच्याबद्दल अफवा पसरवणे किंवा टोकाची भावना म्हणजे त्या व्यक्तीला किंवा त्याच्या प्रतिष्ठेला नष्ट करणे ही इच्छा असते. द्वेष, ही भावना एकदा मस्तकात शिरली की, ती भल्या भल्या व्यक्तींमधील चांगुलपणा...

आनंदी आठवणी आठवण्याचे महत्त्व

Image
 तुमच्या भूतकाळातील, किती चांगल्या आठवणी, तुम्हाला आठवत आहेत? आनंदी आठवणी आठवण्याचे महत्त्व: जेव्हा आपण मागे वळून पाहतो आणि चांगला काळ लक्षात ठेवतो, जो आपण इतरांसह अनुभवला आहे, तो आपल्यासाठी वर्तमानकाळात, पुढे जाण्यासाठी आवश्यक ऊर्जा देणारा इंधन बनतो. म्हणूनच, आपल्याला सर्वात कठीण दिवसांचा सामना करण्यास मदत करण्यासाठी, चांगल्या क्षणांच्या आठवणी ठेवणे, फार महत्वाचे आहे. तो चांगला काळ केवळ आपल्याला वादळात आश्रय देणारा शांततेचा नांगर बनतो, असे नाही; तर आशेचा अविश्वसनीय स्रोत देखील बनतो.  आकर्षणाच्या नियमानुसार, तुम्ही जितका चांगला विचार कराल, तितकेच चांगले तुमच्याकडे आकर्षिले जाईल. जर आपण भविष्याकडे आशेने पाहिले तर, जर उद्याचा काळ आपल्याला जगण्यासाठी उपयुक्त असे अनुभव आणेल व आपल्याला सद्यस्थितीत पसरलेल्या काळ्या छायेतून बाहेर पडण्याची शक्ती मिळेल. म्हणून वर्तमानकाळ, सकारात्मक बाबींमध्ये गुंतवणे, हे खूप महत्वाचे आहे. भूतकाळाकडे पूर्ण पाठ न फिरवता, त्यातील चांगल्या व आनंदी क्षणांच्या आठवणी जाग्या करु या.  आपले मन आनंदाने भरुन, भविष्यकाळासाठी, वर्तमानकाळात चांगला विश्वासाचा पाय...

२. मत्सर: मनाला झालेली कावीळ

Image
हेवा, मत्सर व द्वेष: मनात लपलेल्या किंवा जोपासलेल्या ३ भावना लेखक: बिपिन मयेकर © भाग २:  'मत्सर': मनाला झालेली कावीळ कधी कधी रस्त्याने जाताना, एक अत्यंत महागडी, मार्केटमध्ये नवीनच आलेली भपकेदार गाडी बाजूने जाते व तिच्या मालकाचा हेवा वाटतो.. पण कित्येक जणांच्या बाबतीत, तो हेवा क्षणभर टिकतो. ती गाडी निघून गेली की, तो हेवा सुद्धा थोड्या वेळाने निघून जाण्याची शक्यता असते. पण तीच गाडी, ऑफिसमधील एखाद्या सहकाऱ्याची असेल व माणसाचा स्वभाव दुबळा असेल, तर हेवा लोणच्यासारखा, मुरत जाण्याची शक्यता असते. काही स्त्रियांचे, दागिन्यांबाबतीत वा अन्य बाबतीत असे घडू शकते. पण, कधी कधी, मित्रांमधील, ऑफिसमधील, व्यवसायातील वा नात्यांमधील, एखाद्याची प्रगती किंवा त्याच्याकडे वळणारे बहुतेक सर्वांचे लक्ष (attention) डोळ्यात खुपते. कधी त्याची राहण्याची जागा किंवा किंवा त्याचा बोलण्यातून प्रभाव टाकण्याचा अंदाज, तिची सुंदरता, त्याचा रुबाबदारपणा, स्वतःकडे सर्व नियंत्रण (control) ठेवण्याचा अट्टाहास, अशा अनेक बाबतीत 'हेवा' उत्पन्न होऊ शकतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये 'हेवा' हळूहळू वाढू लागतो, ते...