Posts

Showing posts from November, 2019

स्वत:च्या वागण्याचे समर्थन किंवा विश्लेषण?

Image
असे होते काय तुमच्या बाबतीत? तुम्हाला ज्या व्यक्तीचे वागणे पटत नाही, त्या व्यक्तीला मात्र, स्वत:चे वागणे बरोबर वाटत असते. असे स्वत:च्या बाबतीत सुद्धा होऊ शकते. जेव्हा एखादी व्यक्ती स्वत:च्या वागण्याचे फक्त आणि फक्त समर्थन करते, व स्वत:चे अजिबात विश्लेषण करत नाही, तेव्हा अशी व्यक्ती एकतर स्वत:ला सतत सहानुभूती देत राहते, किंवा समोरच्या व्यक्तीच्या चुका शोधत राहते; वा दोन्ही करत राहते. सासू_सून, सासू_जावई, आई-वडील_मुले, पती_पत्नी, भाऊ_भाऊ/बहीण, मित्र_मित्र/मैत्रीण असे वा इतर नाते, यात अशा विश्लेषण न करता, केवळ स्व:समर्थन करणाऱ्या व्यक्तीचा समावेश असेल तर त्या नात्यात काय घडत असेल? आणि नात्यातील दोघांनाही 'माझेच बरोबर' करायची सवय असेल तर चित्र उभे करा, काय महाभारत घडू शकत असेल? एकतर अश्या नात्यांमध्ये वादविवाद घडत राहतात किंवा ही नाती अलिप्त होतात. सतत स्वत:चेच समर्थन करणाऱ्या व्यक्तीचे शक्यतो कुणाशीही पटत नाही, घरी, अॉफिसमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये, शेजाऱ्यांशी! कारण समोरच्या व्यक्तीची बाजू समजून घेण्याची व स्वत:ची बाजू तपासण्याची यांची तयारी नसते. विश्लेषण करण्याच

हे दिवस पण जातील!

Image
हे दिवस पण जातील! मागील वर्षभरात, अनेक चांगल्या व्यक्तींना भेटण्याचा योग आला. यात व्यावसायिक वा सामाजिकदृष्ट्या यश मिळवणारे होते तसेच अपयशाचा सामोरा करावे लागणारे पण होते. काही जणांना नोकरी अथवा व्यवसायात घवघवीत यश मिळाले होते तर काही जणांचा व्यवसायातील फायदा कमी कमी होत गेला किंवा नोकरीमध्ये विविध समस्या उद्भवत गेल्या. पण यातील बहुतेक व्यक्ती अलगद नकारात्मकतेच्या जाळ्यात अडकत चालल्याचे लक्षात येत आले आहे. यात त्यांचे पूर्णतः चुकते आहे, असे नव्हे. कारण यशाच्या गर्वात किंवा अपयशाच्या चिंतेमध्ये, मनाभोवतीच्या सावधपणाच्या भिंती कोसळू लागतात. यशाच्या गर्वात, दोषांची जाणीव झाली नाही की मग नकारात्मक विचार व नकारात्मक तत्वे, हळूवारपणे मनात शिरत जातात. याउलट, कठीण परिस्थितीत मन अस्थिर होऊ शकते. गोष्टी मनासारख्या होत नाहीत, तेव्हा चांगल्या तत्वांचा आधार वाटत नाही. कमकुवत मनामध्ये मग नकारात्मक विचार व नकारात्मक तत्वे, हळूवारपणे शिरत जातात. मग नैराश्य, राग, चिडचिडेपणा अशा नकारात्मक भावना वाढत जातात. चांगुलपणावरचा विश्वास कमी होऊ लागतो. जीवनात प्रयत्न करण्यासाठी आवश्यक 'आशा' न