Posts

Showing posts from May, 2019

नात्यांचा मुरांबा

'मुरांबा' चित्रपटातील 'देशमुख' या सुखवस्तु कुटुंबातील व्यक्तिरेखा आवडल्या कारण यातील कुणीच जरा जास्त आततायीपणा करत नाही. मला चित्रपटाचे विश्लेषण करावयाचे नाही, तर या चित्रपटातून मी काय शिकायला हवे, ते नमूद करतो आहे. चित्रपटात जरी त्यांच्या आयुष्यातील इतर आव्हाने दाखवली नसली, तरी तरुण मुलाच्या आयुष्यात चाललेला गोंधळ (ब्रेकअपचा प्रश्न) व त्यात प्रखरतेने दिसत असलेला कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिरेखेचा स्वभाव मला भावला. आई: कुटुंबापुरते तिचे जग आहे. कुटुंबावर अर्थात पतीवर, मुलावर आणि हो, मुलाच्या विशेष मैत्रिणीवर, ती प्रचंड प्रेम करते, तरीही त्यातून ती कुटुंबाला वेठीस धरत नाही. आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करत नाही. सतत, 'मी मेलीने एकटीने किती राबायचे..' वगैरे पालुपदे तिच्याकडे नाही आहेत. मला शिकायला आवडेल: एका क्षणी, मुलगा नकळत तिची शैक्षणिक पार्श्वभूमी काढतो, तेव्हा तिला वाईट वाटते. पण ती ते धरुन बसत नाही. आततायीपणा करत नाही. वडील, मुलाला आईच्या बदलत्या काळानुसार, बदल स्विकारण्याच्या मनोवृत्तीबद्दल समजावतात. पुढच्या क्षणी, बाजारात जाण्यापूर्वी मुलगा सवयीप

सगळ्याच सुना वाईट नसतात

सगळ्याच सुना वाईट नसतात.. फेसबुकवर व वॉट्सअपवर माझ्या मित्राने पाठवलेली गोष्ट शेअर केली आणि मैत्रिणींचे तसेच मित्रांच्या बायकांचे फोनचा भडिमार सुरु झाले. गोष्टीचा सारांश: आई, पत्नी व लहान मुलगी, अशा गोड संसारात रममाण असलेल्या पतीला अचानक, बायकोच्या सांगण्यावरुन आईला वृद्धाश्रमात घेऊन जावे लागते. जाताना वाटेत, मुलाला वडील वारल्यानंतर, आईने उपसलेले कष्ट आठवत जातात व तो आईला परत घरी घेऊन जाण्याचे ठरवतो. इथे घरी सुनेला, सासूच्या पलंगावर जुनी पर्स दिसते. उघडून बघते तर आत सासूने, सर्व संपत्ती तसेच दागिने, आपल्या सुनेच्या व नातीच्या नावावर केलेली कागदपत्रे असतात. सून कावरीबावरी होऊन होते. मुलगा आईला घेऊन परत येतो, तेव्हा ती सासूच्या गळ्यात पडून ढसाढसा रडते. फोनवर सगळ्या भगिनींचा एकच सूर होता - सगळ्याच सुना वाईट नसतात. मला पण हे मान्य आहे. त्या गोष्टीतली पार्श्वभूमी वेगळी होती. प्रत्येक कुटुंबातील पार्श्वभूमी वेगवेगळी असू शकते. मूलभूतपणे, टाळी वाजवण्यासाठी दोन्ही हात एकत्र यायला हवेत. तसेच सुखी कुटुंबासाठी, सासू व सून, दोघींनीही समजूतदार असणे आवश्यक असते. सून, लग्न करु

Thank you जिंदगी!

तुमच्या लहानपणी तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे रहायला जात होता काय? मामाच्या घरी किंवा काका/मावशीच्या घरी? तुमचा काय अनुभव होता? माझ्या वारकरी' सासूबाईंनी मला एकदा प्रश्न विचारला. मी लहानपणी मावशीकडे रहायला जात होतो, ते आनंदाचे क्षण सांगितले. आपल्या लहानपणीच्या या आठवणी खूप सुखावह असतात. लहानपणी मामा/काका/मावशीच्या घरी रहायला गेलो असता, तिथे आपल्या वागण्याबोलण्यामध्ये परकेपणा नव्हता. आपुलकी होती, विश्वास होता. भूक लागली तर उपलब्ध असलेल्या चांगल्या पर्यायांपैकी चांगले खायला मागितले. झोप आली तर झोपलो. आवश्यक ती कामे सुद्धा आत्मीयतेने केली होती. त्या घरात एखादी दुर्घटना घडली (एखादी भिंत कोसळली वा वस्तू पडून फुटली) तर आपल्याला सुद्धा वाईट वाटत असे. पण आपल्या नातेवाईकांना जितके वाईट वाटले असेल तितके वाईट वाटले नसेल. एखादी चांगली घटना घडली तर आनंद झाला असेल पण त्या नातेवाईकांना झाला त्या प्रमाणात आनंद झाला नसेल. कारण कुठेतरी जाणीव असते - मी इथे तात्पुरता राहायला आलो आहे, हे सर्व सोडून मला जायचे आहे. मग या भौतिक जगाचे सुद्धा तसेच आहे. आपण इथे तात्पुरते राहायला आलो आहोत. त्य

तुम्हाला प्रश्न पडतात काय?

You never meet the same man again. भगवान गौतम बुद्ध: "ते झाड होत आहे." हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत, झाडाची काही पाने गळून पडली असतील, नवीन कोंब वा पालवी फुटण्याची प्रक्रिया काकणभर का होईना सुरु झाली असेल, मुळे जमिनीत किंचित सरकली असतील. क्षणाक्षणाला बदल घडत आहे. वपुंच्या शब्दांत थोडी , जगण्यावर तुटून प्रेम केले की जिज्ञासा जिवंत राहते. 'कशामुळे?' व 'कशासाठी?' असे प्रश्न पडत राहतात. जगण्याचे महोत्सवात रुपांतर होते. सामान्य माणसाला जगण्यापलिकडचे प्रश्न पडत नाहीत किंबहुना आवडत नाहीत. तुम्ही प्रश्न निर्माण करता काय? कोणता प्रश्न माणसामध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो? दररोज सकाळी व रात्री झोपताना कोणते दोन प्रश्न, तुमचे आयुष्य आमूलाग्र बदलू शकतात? माझे दोन प्रश्न: सकाळी: माझा आजचा दिवस, प्राणीपक्षांप्रमाणे निव्वळ जिवंत राहण्यापेक्षा, मनुष्य म्हणून सार्थकी लावण्यासाठी कोणत्या पाच गोष्टी, मी.करायलाच हव्यात? रात्री झोपण्यापूर्वी: माझा आजचा दिवस, प्राणीपक्षांप्रमाणे निव्वळ जिवंत राहण्यापेक्षा, मनुष्य म्हणून सार्थकी लावण्यासाठी कोणत्या प्रमुख त

विद्यार्थी दशा व दिशा

विद्यार्थी: दशा व दिशा 'विद्यार्थी' शब्दाचा अर्थ विद्या मिळवण्यासाठी प्रयत्न करणारा असा होतो. मी या इथे व पुढे जरी पुरुषवाचक शब्द वापरला तरी तो शब्द, विद्यार्थी मुलगा व मुलगी, अशा दोघांनाही लागू असेल. या लेखातून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. ठराविक व विशेष कामगिरी नेमून देणार आहे. 'प्रसन्न' या आमच्या प्रशिक्षण संस्थेत आम्ही लहान मोठी अशा दोन्ही व्यक्तींना एक शिकवण सुरुवातीस दिली जाते ती म्हणजे - 'कोणतेही कार्य सुरु करण्यापूर्वी, तुम्हाला त्याचा हेतू व परिणाम माहीत असावयास हवा.' विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, चला, मग या प्रथम कामगिरीला सुरुवात करा: तुम्ही कशासाठी शिकत आहात व तुमच्या शिकण्यामुळे तुमच्या आयुष्यात काय काय चांगले परिणाम होणार आहेत? याचे चित्र मनात तयार करा व त्यावर तुमचा लेखी अहवाल तयार करुन शिक्षक व पालकांबरोबर चर्चा करा. एखाद्या विद्यार्थ्याला तो कशासाठी शिकत आहेत व त्याला शिक्षणातून काय साध्य करायचे; याची कल्पना नसेल तर अशा विद्यार्थ्याचे अभ्यासात कसे लक्ष लागेल? याऊलट ज्या विद्यार्थ्याकडे 'त्याला आयुष्यात काय बनायचे आहे', हे ध्

परिवर्तन तरुणाईचे

परिवर्तन तरुणाईचे मूल प्रौढ बनण्याअगोदर मध्ये एका महत्वाच्या टप्प्यातून जात असते: तारुण्य! या टप्प्यात प्रवेश करत असलेल्या मुलांना समजून घेत, योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असते. काही बाबतीत पालकच ही भूमिका छान निभावून नेऊ शकतात. पण बहुतेक बाबतीत बाह्य मार्गदर्शक असणे, गरजेचे असते. आजची ही तरुणपणाच्या उंबरठ्यावर असलेली पिढी भविष्यकाळ घडवणार असते. म्हणून त्यांच्याकडून जबाबदारीच्या अपेक्षा असतात. फक्त त्या अपेक्षा जास्त नको तर रास्त असायला हव्या. वयानुसार होत असलेल्या शारीरिक व मानसिक बदलांमुळे, काही वेळा तरुणाई विचित्र वागते तर काही वेळा पालकच त्यांना बंडखोरीचे लेबल लावून मोकळे होतात. आवश्यकता असते ती जाणीव निर्माण करण्याची! जाणीव असेल तर योग्य मार्ग दाखवण्याची! बिपिन मयेकर ९८१९००१२१५