Posts

Showing posts from October, 2020

मन मोकळे करणे व विश्र्वास

Image
नमस्कार !  जुन्या मित्राचा फोन आला होता. तो सांगत होता की ग्रुपमध्ये प्रचंड गोंधळ सुरू आहे. काही जण जे  वैयक्तिक चर्चांमध्ये जे ऐ कतात, ते इतरांना जाऊन सांगतात. त्यामुळे गैैैरसमज वाढत चालले आहेत. जेव्हा एखादा माणूस तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि तुमच्याकडे आपलं मन मोकळं करतो तेव्हा तुमची जबाबदारी वाढते. १. तो तुमच्याशी बोलताना काही चुका करत असेल तर शांतपणे व कल्पकतेने त्या चुका त्यालाच सांगा, पण इतरांना नको. २. समोरचा माणूस रागारागाने आपलं मन मोकळं करत असेल तर तो चुकू शकतो, तसेच भावनेच्या भरात तो काहीबाही व्यक्त करु शकतो. आपण मात्र काळजी घ्यायला हवी.  अशा माणसाला उद्युक्त करण्याच्या ऐवजी, त्याला शांत करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अन्यथा आपण समोरच्या माणसाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो. ३. जेव्हा एखादा माणूस शांत व समंजसपणे आपली व्यथा तुमच्याकडे व्यक्त करतो, तेव्हा ती व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न करा. पण कोणत्याही परिस्थितीत, त्या व्यथेचा, कळत किंवा नकळत फायदा घेण्याचा प्रयत्न अजिबात करु नका. ४. तुमच्याजवळ आपलं मन मोकळं करणारा माणूस तुमच्याशी व त्या क्षणांशी प्रामाणिक असतो.  तुम्हीस