कोळी, जिद्द आणि तुम्ही..!

 जाळं विणताना, कोळी सहा वेळा खाली पडला.. अयशस्वी झाला.. पण सातव्यांदा, त्या कोळ्याने परत झेप घेतली व आपले जाळे पूर्ण केले.


ते प्रत्येक अयशस्वी प्रयत्न पाहत, कोळ्याबरोबर, स्वतःला सहानुभूती देत असलेला, स्कॉटलंडचा रॉबर्ट द ब्रूस, कोळ्याचा सातवा यशस्वी प्रयत्न पाहून अचंबित झाला.


तो स्वतः सहा वेळा, क्रांतीचा सहा वेळा अयशस्वी प्रयत्न करुन निराश बसला होता. पण, त्या एवढ्याशा छोट्या कोळ्याने, त्याला जिद्द-चिकाटी शिकवली व रॉबर्ट द ब्रूस, परत सज्ज झाला.


तुम्ही काय करत आहात?

प्रयत्न सोडून, आहे ते मान्य करुन, गप्प बसला आहात? दिवस ढकलत आहात?

की,

तुमच्या जिद्द व चिकाटीने, प्रयत्न करत आहात?


चला, होऊ या प्रसन्न!

बिपिन मयेकर

लेखक


Comments

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?