खरा आदर व महत्व

 खरा आदर व महत्व


गुहेमध्ये सिंह झोपला असताना, एक उंदीर इकडे तिकडे उड्या मारत होता. 


त्याच्या आवाजाने सिंहाला जाग आली व त्याने त्या उंदराला पंजात पकडले. उंदीर थरथर कापू लागला. त्याने सिंहाला विनंती केली, "मला सोडून द्या. मला जेव्हा व जशी जमेल, तशी मी तुम्हाला मदत करेन." 


उंदीराचे हे बोलणे ऐकून सिंह खदाखदा हसू लागला. आणि "तू काय मला मदत करणार?" असे बोलून त्याने उंदराला सोडून दिले. 


काही दिवसांनी जंगलामध्ये शिकार्‍यांनी दोरीचा सापळा रचला होता. रात्री सिंह त्यात अचानक अडकला व जोराने डरकाळी फोडून लागला. 


इतक्यात तिथे उंदीर आला व त्याने सिंहाची अवस्था बघितली. शिकारी यायला वेळ होता. सकाळपर्यंत तरी शिकारी येणार नव्हते. उंदीर सिंहाकडे बघून परत निघून गेला, पण सिंहाला त्याचे काहीच वाटले नाही. 


थोड्या वेळाने उंदीर परत आला, तेव्हा त्याच्याबरोबर त्याचे कुटुंबीय व मित्रमंडळी होती. 


त्या सर्वांनी आता शिकार्‍यांनी लावलेल्या दोऱ्यांच्या सापळ्यातील, दोऱ्या कुरतडायला सुरुवात केली. हळूहळू एक एक करत, जेव्हा त्यांनी तीन-चार दोऱ्या कुरतडतल्या, तेव्हा सापळा ढिला झाला व सिंह त्यातून अलगद बाहेर आला. 


बाहेर आल्यानंतर सिंहाने अश्रू भरल्या डोळ्याने उंदीराचे आभार मानले आणि माफी सुद्धा मागितली.


आपल्या आयुष्यात सुद्धा कित्येकदा असे होते, आपण आपल्या कडे असलेले पद व पैसा यामुळे, आजूबाजूच्यांना गृहीत धरायला सुरुवात करतो. कित्येकदा त्यांना योग्य महत्त्व देत नाही. त्या प्रत्येक वेळेला ही सिंह व उंदराची गोष्ट आठवायला हवी.


मेणबत्ती कोणत्याही आकाराची असली तरी अंधकार दूर करणारा प्रकाश देते.


कोणालाही कमी लेखू नका. प्रत्येक व्यक्ती महत्वाची असू शकते.


महत्व तुमच्या स्वभावामुळे व कृतींमुळे, मिळायला हवे.


पैसा किंवा पद, केवळ यांच्यावर महत्व मिळवण्यासाठी अवलंबून असाल, तर, लक्षात ठेवायला हवे. 


"पैसा व पद, हे पायात घातलेल्या चपलांप्रमाणे असतात. ज्या दिवशी, ही चप्पल पायातून उतरते; तेव्हा खऱ्या अर्थाने खडे टोचायला सुरुवात होते."


आपल्या पदाचा व पैशाचा गर्व असलेल्या व्यक्ती, त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तींचा पाणउतारा करत असतात; किंवा त्यांना रास्त महत्व देत नाहीत. मग या सभोवतालच्या व्यक्तींचा विश्वास व प्रेरणा कमी होत जाते.


त्यातून जर स्वतःच्या पद व पैशाचा उपयोग, हा केवळ सभोवतालच्या माणसांचा वापर करण्यासाठी केला, आणि त्यांच्या ते लक्षात आले तर मग सभोवतालची माणसे काय प्रतिसाद देतील?


जसे सभोवतालच्या व्यक्तींना आदर देणे, त्यांचे महत्त्व जपणे, महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे कित्येकदा समोरील व्यक्तीला, समजूतदारपणा दाखवताना सुद्धा काळजी घ्यायला हवी. कारण तुमच्या अतिसमजूतदारपणाला गृहीत धरायला सुरुवात झाली, की मग त्यामुळे पण तुमचे महत्त्व कमी होत जाते. मग तुम्ही जरा जरी त्यांच्या मनाविरुद्ध वागलात, तर तुम्ही केलेली पूर्वीची मदत विसरुन ते वेगळ्या दिशेने जाऊ शकतात.


महत्व तुमच्या स्वभावामुळे व कृतींमुळे, मिळायला हवे.


पैसा किंवा पद, केवळ यांच्यावर महत्व मिळवण्यासाठी अवलंबून असाल, तर, लक्षात ठेवायला हवे. 


"पैसा व पद, हे पायात घातलेल्या चपलांप्रमाणे असतात. ज्या दिवशी, ही चप्पल पायातून उतरते; तेव्हा खऱ्या अर्थाने खडे टोचायला सुरुवात होते."


ज्ञान व कौशल्य यांच्या आधारावर (हल्ली इतर मार्गही आहेत म्हणे..) पद व पैसा मिळवता येतो. परंतु, त्याला योग्य नम्रता व ठामपणा यांची साथ असते, तेव्हा त्यातून योग्य व दीर्घकालीन महत्त्व मिळत जाते.


तुमचा स्वभाव व तुमचे वागणे-बोलणे; तुमचे महत्व टिकवण्यासाठी महत्त्वाचे आहे, हे लक्षात घ्या.


आपला,

बिपिन मयेकर

+91 70215 08470 (WhatsApp number)

कॉर्पोरेट ट्रेनर व बिझनेस कोच


१५० भारतीय व आंतरराष्ट्रीय कंपनीत बरोबर २३ वर्षांचा अनुभव


भारतातील प्रथम व जगातील तृतीय अधिकृत एन एल पी गोल्ड मास्टर ट्रेनर, National Federation of Neuro Linguistic Programming USA


वैयक्तिक मार्गदर्शक व राजकीय सल्लागार


व्यवसाय, वर्तणूक व संवाद मार्गदर्शनपर लेखक

५ पुस्तके व ९ वृत्तपत्र सदरे प्रसिद्ध


आत्ताच भेट द्या:


https://youtube.com/c/BipinMayekar


https://youtube.com/channel/UCLTbyOCkgpSVTuIUDR5Wk1A


https://www.facebook.com/BipinSir/


https://www.linkedin.com/in/mayekarbipin

Comments

Popular posts from this blog

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

१. हेवा: तुलनेतून जन्मणारी भावना

आजार, आधार आणि दृष्टिकोन