Posts

Showing posts from January, 2022

स्नेहसंमेलन

Image
 *शाळासोबत्यांचे स्नेहसंमेलन* (Reunion) लहान मुले पटकन एकत्र येऊ शकतात, पण मोठ्या माणसांसाठी एकत्र येण्याची प्रक्रिया कठीण असू शकते. कारण वयपरत्वे, प्रत्येकाची स्वतंत्र मनोवृत्ती तयार झाली असते, ज्यातून प्रत्येकजण स्वतःभोवती छोटेमोठे भावनिक कुंपण तयार करुन ठेवतो. हे भावनिक कुंपण मग एकतर समाजात मिसळण्याची क्षमता, कमीजास्त करत जाते. शाळासोबत्यांचे स्नेहसंमेलनामध्ये, सर्व स्वभावाची माणसे एकत्र येतात. यातून प्रत्येकाची, सामाजिक संवेदनशीलता वाढू शकते, जेव्हा अशा प्रकारचे स्नेहसंमेलन, चांगल्या हेतूने व योग्य रितीने, आयोजित केलेले असेल.  फक्त एकमेकांना खूप वर्षांनी भेटण्यापुरते, स्नेहसंमेलन मर्यादित ठेवले, तर पहिल्या एकदोन भेटींनंतर, मनोबंध जुळले नाहीत तर मग बहुतेकांच्या भेटीतील अप्रूप कमी होऊ शकते.  याचे.कारण, जे अगोदरपासून एकमेकांच्या संपर्कात असतात, ते ज्या मनमोकळेपणाने एकमेकांना भेटतात, ते पाहून सामाजिक न्यूनगंड असणाऱ्या मित्रमैत्रिणींची भीड अजून वाढते.  धमाल करत असलेल्या, मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात, शिरण्यापेक्षा मग एकटे बसणे, किंवा आपल्यासारख्या एखाद्यासोबत, टाईमपास करणे, ते पसंत करतात