डर के आगे जीत हैं..

 


_डर के आगे जीत हैं.._

*भिती व चिंता, यांच्यामध्ये खूप फरक आहे.*
_प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत जोशी यांच्या शब्दात_,
*भिती म्हणजे संकटाची प्रतिक्रिया*
*चिंता म्हणजे समोर नसलेल्या संकटाची अपेक्षा....*

_एखादा मोठा भुंकणारा कुत्रा समोर आला तर, भिती वाटू शकते. कारण तो भुंकणारा मोठा कुत्रा समोर आहे._
_परंतु काही जण या भुंकणाऱ्या मोठ्या कुत्र्याला सुद्धा घाबरत नाहीत._
_याउलट काही जण, केवळ 'कुत्र्यापासून सावधान' हे पाटी बघून, किंवा कुत्र्यांचा दुरुन येणारा आवाज ऐकून सुद्धा घाबरतात.__

*कुत्रा समोर आल्यानंतर, त्या संकटाची प्रतिक्रिया म्हणून जी भावना निर्माण होते, ते भिती!*

*पण समोर कुठेही कुत्रा दिसत नसताना सुद्धा, जी भावना मनामध्ये निर्माण होते ती चिंता!*

चिंता करणारी माणसं आपलं आयुष्य स्वतःहून व्यर्थ घालवत असतात. कारण बहुतांशी वेळा, ज्या गोष्टीची वा बाबींची अथवा घटनांची चिंता वाटत असते, ज्या कारणामुळे चिंता वाटत असते, तसं काहीच घडत नाही. ही चिंता फोल ठरते. पण मग त्यामुळे चिंता करणाऱ्यांच्या आयुष्यात किती नुकसान होत असेल, त्याचा विचार चिंता करणाऱ्यांनी करायला हवा.

या जगात चिंतेच्या बाबतीत तीन प्रकारची माणसे आहेत: चिंतातुर / बेफिकीर/ बेदरकार

बेदरकार माणूस हा समोर एखादे आव्हान वा कठीण परिस्थिती आल्यानंतर डगमगत नाही. तो त्यातील वास्तविकता शोधतो. आणि परिस्थितीचे तसेच स्वतःचे नीट विश्लेषण करून आव्हानाला सामोरं जातो.

बेफिकीर माणूस हा कसलेही विश्लेषण न करता खोट्या प्रौढीने उगाचच वेडेवाकडे धाडस करु शकतो.

चिंतातूर व्यक्ती, या छोट्या छोट्या गोष्टीने घाबरुन जातात. परिस्थितीला सामोरे न जाता, कोणतेही विश्लेषण न करता, स्वतःला एका कोषात बंद करून घेतात. यामुळे आयुष्यातील अनेक चांगल्या संधी ते गमावून बसण्याची शक्यता असते.

वर नमूद केल्याप्रमाणे, *चिंता निर्माण करणे, हा मनाचा खेळ असतो.*

_कित्येकदा, आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे, किंवा जगाचा जास्त अनुभव नसल्यामुळे किंवा तारतम्याचा अभाव असल्यामुळे चिंता निर्माण होण्यास वाव मिळतो._

'संशय' हा सुद्धा चिंता चिंता निर्माण करणारा, महत्त्वाचे कारण मानला जातो. 'संशय' हा माणसाच्या मनात व्यक्तींबद्दल, नात्यांबद्दल, श्रीमंत/गरीबांबद्दल, काहीवेळा जाती/धर्माबद्दल, एखाद्या व्यवसायाबद्दल निर्माण होऊ शकतो, किंवा केला जाऊ शकतो. संशय निर्माण होताना, कित्येकदा जवळपासच्या व्यक्ती त्यात भर टाकू शकतात.

तिथे आपण ठरवायचे असते की, _कोणताही विचार जेव्हा सरसकट स्विकारला जातो, तेव्हा तो अवास्तव होण्याची शक्यता जास्त असते._

*प्रसन्न प्रशिक्षणक्रमामध्ये चिंता निर्माण होण्याची २५ कारणे दाखवली जातात*.

*या कारणांपैकी ज्या कारणांनी तुमच्या मध्ये चिंता निर्माण होते, त्या त्या कारणांची चिकित्सा केली जाते*. _तुमच्या भूतकाळात काही घडले होते काय, याचा मागोवा घेतला जातो_. तसेच, ती चिंता किती फोल आहे, याचे *तुमच्याकडूनच विश्लेषण करून घेतले जाते.*

*त्यामुळे सहज रितीने, कायमस्वरुपी ते चिंतेचे कारण तुमच्या मनातून दूर होते व तुमचा आत्मविश्वास अधिकाअधिक वाढत जातो.*

*चिंता दूर करण्याचा मार्ग म्हणजे, कृती करणे.*

*चिंता दूर करण्यासाठी आवश्यक कृती करण्यासाठी, प्रसन्न प्रशिक्षणक्रमामध्ये वास्तव विचारसरणी शिकवली जाते. तसेच आत्मविश्वास आणि धाडस, वाढवण्याची तंत्रे शिकवली जातात.*

*बिपिन मयेकर*
*_कॉर्पोरेट ट्रेनर_ बिझनेस कोच_*
_*वर्तणूक व संवाद अभ्यासक*_
*_वैयक्तिक सल्लागार_ _लेखक_*
*तुमची प्रगती हाच माझा ध्यास*

Visit now:

https://youtube.com/c/BipinMayekar

https://youtube.com/channel/UCLTbyOCkgpSVTuIUDR5Wk1A

https://www.facebook.com/BipinSir/

https://www.linkedin.com/in/mayekarbipin

Comments

Popular posts from this blog

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

१. हेवा: तुलनेतून जन्मणारी भावना

आजार, आधार आणि दृष्टिकोन