Posts

Showing posts from June, 2022

खरा आदर व महत्व

 खरा आदर व महत्व गुहेमध्ये सिंह झोपला असताना, एक उंदीर इकडे तिकडे उड्या मारत होता.  त्याच्या आवाजाने सिंहाला जाग आली व त्याने त्या उंदराला पंजात पकडले. उंदीर थरथर कापू लागला. त्याने सिंहाला विनंती केली, "मला सोडून द्या. मला जेव्हा व जशी जमेल, तशी मी तुम्हाला मदत करेन."  उंदीराचे हे बोलणे ऐकून सिंह खदाखदा हसू लागला. आणि "तू काय मला मदत करणार?" असे बोलून त्याने उंदराला सोडून दिले.  काही दिवसांनी जंगलामध्ये शिकार्‍यांनी दोरीचा सापळा रचला होता. रात्री सिंह त्यात अचानक अडकला व जोराने डरकाळी फोडून लागला.  इतक्यात तिथे उंदीर आला व त्याने सिंहाची अवस्था बघितली. शिकारी यायला वेळ होता. सकाळपर्यंत तरी शिकारी येणार नव्हते. उंदीर सिंहाकडे बघून परत निघून गेला, पण सिंहाला त्याचे काहीच वाटले नाही.  थोड्या वेळाने उंदीर परत आला, तेव्हा त्याच्याबरोबर त्याचे कुटुंबीय व मित्रमंडळी होती.  त्या सर्वांनी आता शिकार्‍यांनी लावलेल्या दोऱ्यांच्या सापळ्यातील, दोऱ्या कुरतडायला सुरुवात केली. हळूहळू एक एक करत, जेव्हा त्यांनी तीन-चार दोऱ्या कुरतडतल्या, तेव्हा सापळा ढिला झाला व सिंह त्यातून अलगद बाह