Posts

Showing posts from March, 2020

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा कसा पुढे चालवणार?

Image
हॉस्पिटलमधून परत येताना पाहिले, माझे एक परिचित गृहस्थ, त्यांच्या मित्रांसह उभे होते. सगळे जण एकमेकांना खेटून उभे होते. काही जणांचे, एकमेकांच्या गळ्यात हात होते. सदर परिचित गृहस्थ, छत्रपती शिवाजी महाराजांचे परम भक्त आहेत. मला घरी परतताना, महाराजांचे किल्लेदाराला लिहिलेले पत्र आठवले. मी शाळेत असताना, आमच्या मराठीच्या शिक्षिकांनी ते पत्र इतक्या छान पद्धतीने शिकवले होते की ते पत्र पण लक्षात आहे व त्यातील मतितार्थ! छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्लेदारास पत्रात बजावले होते: दिवसरात्र कडा सूक्ष्म पहारा ठेवा. तेलाच्या आमीषाने, उंदीर गडावरील दिव्यांतील तेलाची वात पळवतील. जर ती जळती वात धान्य_आगर किंवा शस्त्रागारावर पडली, तर अनर्थ होईल. धान्य_आगर पेटले व धान्य जळून खाक झाले तर सैनिकांना खायला काय देणार? उपाशी पोटी सैन्य कसे लढणार? तसेच शस्त्रागारावर जळती वात पडली व दारुगोळ्याचा स्फोट होऊन शस्त्रे नष्ट झाली तरी सुद्धा किल्ला राखायला जड जाईल. इतका सूक्ष्म विचार करणाऱ्या व सावध असणाऱ्या द्रष्ट्या महाराजांचे आपण नाव घेत असू, तर आपण किती सावध असायला हवे? आपण खरोखरच सूक्ष्म विचार करत आहोत काय?

चला होऊ या हिरकणी!

Image
जागतिक महिला दिनानिमित्त चला, होऊ या हिरकणी! रायगडाच्या पायथ्याखाली असणारे एक वाळेसर नावाचे छोटेसे गाव…. त्या गावातील एक धनगर कुटूंब. कुटूंबाचा उदरनिर्वाह घरातील गुरांचे दुधावर चाले…. घरातील दुध गडावर घेऊन जाण्याचे काम ह्या घरातील स्त्री हिरा करायची…. *तुम्ही कोण आहात, यापेक्षा तुम्हाला काय मिळवायचे आहे; ते जास्त महत्त्वाचे असते.* हिरा ही एका तान्हुल्याची माता. त्या दिवशी पण ती गडावर पोहचली दुध विकायला. पण संध्याकाळ होऊन गेली. आता तिच्या लक्षात आले की गडाचे दरवाजे बंद झाले असणार. रायगडावर जाण्यायेण्यासाठी फक्त मुख्य दरवाजा…. *कित्येकदा तुम्हाला ज्या मार्गाने यश मिळणार, यांची खात्री असते, तो मार्गच बंद होतो.* रायगडाचे दरवाजे बंद झाले की फक्त वारा आणि पाऊसच गडावर पोहचायचा. हिरा जाऊन दरवाज्या जवळ असणार्‍या शिपायांना विनवणी करू लागली. पण काही उपयोग झाला नाही. *आता यापुढे काहीच शक्य नाही, असे वाटते.* तिला गडावरून घरी जाणं गरजेच होतं. तिचा तान्हुला तिची वाट पाहत होता. तान्ह बाळ आई शिवाय किती वेळ राहणार होते… ह्या मातेला आता डोळ्यासमोर फक्त बाळाचा चेहरा दिसत होता…. आता कुठल्य