Posts

Showing posts from November, 2020

संवाद साधा. सत्य परिस्थिती जाणून घ्या!

Image
तो कारमध्ये बाजूलाच बसला. कपाळावर आठ्या पडल्या होत्या. नजर चुकवत होता. माझा खास मित्र होता, म्हणून मी चपापलो. मुंबई विद्यापीठाच्या हिरव्यागार वातावरणात, नुकतंच प्रसन्न एनएलपीचे पहिल्या दिवसाचे ट्रेनिंग सेशन आटोपून निघालो होतो. आज खूश होतो, कारण माझा खास मित्र प्रसन्न एनएलपीच्या कोर्ससाठी आला होता. सकाळी सगळ्या प्रशिक्षणार्थींची ओळखपाळख झाली. सर्वांबरोबर मित्राचा चेहरा उत्सुकतेने भरला होता. लंचपर्यंत तो आनंदाने सहभागी होत होता, पण लंचनंतर तो थोडा मागे कलला होता. आणि आता गाडीत बसल्यावर वर नमूद केलेला प्रकार! "काय झालंय?" असे विचारताच तो तुटून पडला.  "अरे, मित्र ना तू? मग शिकवताना माझ्या घरातले संदर्भ कशासाठी? तू देत असलेली बहुतेक उदाहरणे माझ्या घरातील व्यक्तींची होती. कशासाठी?" जोरात व सलग बोलण्यामुळे त्याला खोकला उचलला. मी पाण्याची बाटली पुढे करत त्याला विचारले, मला सांग, मी कुणाचे नाव घेतले होते काय? नाही ना!" त्याने नकारार्थी मान हलवली. मी समजावले, "मी एकाच कुटुंबातील उदाहरणे दिली तर इतर प्रशिक्षणार्थी त्याबरोबर कसे कनेक्ट होणार? मला ते व्यवसायाच्या अनुषं

ईर्षा किंवा आत्मसन्मान

Image
प्रिय मित्रमैत्रिणींनो,  नमस्कार! न्यूनगंड व गर्व असणारी माणसं ईर्षा करतात. नकळतपणे, अंतर्मनात स्वतःला कमी लेखले जाते व समोरील माणसाच्या सामाजिक, आर्थिक वा व्यावसायिक कर्तृत्वाला वा योग्यतेला कमी लेखण्याचा प्रयत्न सुरु होऊ शकतो. तुलना सुरु झाल्यामुळे, ईर्षा उत्पन्न होते. मूलभूत स्वत:वर व स्वकतृत्वावर, ठाम विश्वास असेल तर माणूस ईर्षेच्या मार्गावर जात नाही. एकतर समोरील माणसाच्या योग्यतेची, स्थितीची वा कर्तबगारीची स्तुती करतो, वा समोरील माणूस उद्दाम असेल तर दुर्लक्ष करतो. निवड आपली असते.... बिपिन मयेकर वैयक्तिक मार्गदर्शक तुमची प्रगती हाच माझा व्यवसाय