Posts

Showing posts from April, 2022

मैत्री: नाण्याच्या दोन बाजू

मैत्री: नाण्याच्या दोन बाजू!            चालण्याचा व्यायाम (walk) करताना, मी एखाददुसऱ्या ठिकाणी थांबतो. कालही थांबलो होतो. बाजूला चार अमराठी तरुण गप्पा मारत होते. आजूबाजूला इतरांच्या कानावर आपले शब्द पडतील, यांची तमा न बाळगता बोलत होते. एका मित्राच्या बाबतीत चर्चा होती. उर्वरित तिघांपैकी, एक जण त्याच्या बाजूने बोलत होता; तर दुसरा वेगळे मत नोंदवत होता. तिसरा कसलीही फिकीर न करता, मोबाईलमध्ये बहुधा गेम खेळत होता. ज्या मित्राच्या बाबतीत बोलणे सुरु होते, एक जण त्याला समजावत होता की, तू तुझ्या गर्लफ्रेंडला आयुष्यात करिअरमध्ये पुढे जाऊ देत नाहीस, हे योग्य नाही. तर दुसरा बाजू घेऊन बडबडत होता, जर तिने प्रगती केली तर, त्या मुलीचे आई-वडील तिचे लग्न तोलामोलाच्या मुलाबरोबर करुन देतील आणि हा मित्र बाजूला राहील.  ज्याच्याबद्दल ती चर्चा सुरु होती, त्याचे मत सुद्धा तेच होते, 'तिने प्रगती केली तर, हा बाजूला पडू शकतो.' ही चिंता त्याला सतावत होती, म्हणून तो आपल्या खास मैत्रिणीला जमेल त्या प्रकारे, प्रगतीच्या मार्गावरुन मागे खेचत होता. चौथ्या मित्राला विचारलं असता, त्याने सरळ मित्रांना धुडकावून लावल

डर के आगे जीत हैं..

Image
  _ डर के आगे जीत हैं.. _ * भिती व चिंता, यांच्यामध्ये खूप फरक आहे. * _ प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत जोशी यांच्या शब्दात _ , * भिती म्हणजे संकटाची प्रतिक्रिया * व * चिंता म्हणजे समोर नसलेल्या संकटाची अपेक्षा.... * _ एखादा मोठा भुंकणारा कुत्रा समोर आला तर, भिती वाटू शकते. कारण तो भुंकणारा मोठा कुत्रा समोर आहे. _ _ परंतु काही जण या भुंकणाऱ्या मोठ्या कुत्र्याला सुद्धा घाबरत नाहीत. _ _ याउलट काही जण, केवळ 'कुत्र्यापासून सावधान' हे पाटी बघून, किंवा कुत्र्यांचा दुरुन येणारा आवाज ऐकून सुद्धा घाबरतात. _ _ * कुत्रा समोर आल्यानंतर, त्या संकटाची प्रतिक्रिया म्हणून जी भावना निर्माण होते, ते भिती! * * पण समोर कुठेही कुत्रा दिसत नसताना सुद्धा, जी भावना मनामध्ये निर्माण होते ती चिंता! * चिंता करणारी माणसं आपलं आयुष्य स्वतःहून व्यर्थ घालवत असतात. कारण बहुतांशी वेळा, ज्या गोष्टीची वा बाबींची अथवा घटनांची चिंता वाटत असते, ज्या कारणामुळे चिंता वाटत असते, तसं काहीच घडत नाही. ही चिंता फोल ठरते. पण मग त्यामुळे चिंता करणाऱ्यांच्या आयुष्यात किती नुकसान होत असेल, त्याचा विचार चिं

परीसाचा दगड मिळाला काय?

Image
 जागते रहो.. सावध रहा... एक माणूस परीस ( पारस ) शोधायला निघाला.  त्यासाठी रस्त्यात जो दगड येईल तो घ्यायचा, गळ्यातल्या साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा; असा त्याचा दिनक्रम सुरु झाला. दिवस गेले, महिने लोटले.. वर्षे सरली.. पण त्याच्या दिनक्रमात बदल झाला नाही. दगड घ्यायचा,साखळीला लावायचा आणि मग तो फेकून द्यायचा..   शेवटी तो माणूस म्हातारा झाला...  आणि ज्या क्षणी, तो आपले शेवटचे श्वास मोजत होता.. त्यावेळी अचानक त्याचे लक्ष त्याच्या गळ्यातील साखळीकडे गेले, ती साखळी सोन्याची झाली होती... दगड घ्यायचा, साखळीला लावायचा आणि फेकून द्यायचा.. या नादात त्याचे साखळीकडे लक्षच गेले नाही..  तात्पर्य :-प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी परीस येत असतो...  कधी आई- वडिलांच्या रुपाने, तर कधी भाऊ-बहिणीच्या नात्याने..  तर कधी मित्राच्या वा मैत्रिणीच्या नात्याने ...  तर कधी जवळच्या नात्याने....  कोणत्या ना कोणत्या रुपात, तो आपल्याला भेटत असतो...  आणि आपल्यातल्या लोखंडाचे सोने करीत असतो......  आपण जे काही असतो किवा बनतो, त्यात त्यांचा बराच हातभार असतो ......  पण फार कमी लोक या परीसाला ओळखू शकतात..... परीसाचा दगड, अर्

कृतज्ञता: जादूचा दिवा

Image
 अनेक ज्ञात-अज्ञात मान्यवरांच्या कृतज्ञतेविषयक विचारांनी भारावलेला हा लेख आहे. कृतज्ञतापूर्वक आपणांसमोर सादर करत आहे. तुम्ही करु शकता, अशा सर्वात चांगल्या आध्यात्मिक गोष्टींपैकी एक, म्हणजे स्वतः माणुसकी स्विकारणे. माणुसकी असणारी व्यक्ती, इतरांचे आभार मानते. धन्यवाद देते. 'धन्यवाद!' हा सर्वोत्तम प्रभावी शब्दांपैकी एक आहे, जो कोणीही म्हणू शकतो.  मी हा प्रभावी शब्द नेहमी वापरत असतो. रेस्टॉरंट मध्ये खाणे वाढणारा वेटर असो वा टेबल साफ करणारा मुलगा असो, रिक्षा/टॅक्सी ड्रायव्हर असो वा रस्त्यात समोरासमोर आल्यावर, प्रथम मला जाऊ देणारी व्यक्ती असो, वा छोटीमोठी मदत करणारी कोणतीही व्यक्ती असो.. 'धन्यवाद' हे प्रभावी शब्द तोंडातून आपसूकच बाहेर येतात. 'धन्यवाद म्हणणे', आपल्यातील, नम्रता व समजूतदारपणा व्यक्त करते. आभार मानणे, ही कृतज्ञतेची सुरुवात आहे. कृतज्ञता म्हणजे आभार व्यक्त करण्याची पूर्णता. आभार व्यक्त करताना, केवळ शब्द असू शकतात.  कृतज्ञता कृत्यांमध्ये दर्शविली जाते. कित्येकदा, धन्यवाद बोललास ना, झाले तर.. असा दृष्टिकोन निर्माण होऊ शकतो. पण, खरी कृतज्ञता ही कृतींमधूनच व्

ही कोण?

 "काय रे, कोण?" एका संध्याकाळी रात्री घरी परत येत असताना वाटेत थांबून मोठ्या भावाच्या मित्राने प्रश्न विचारला.  मला कळले नाही. मी विचारले, "कोण?"  तेव्हा त्याने डोळे मिचकावत विचारले, "अरे, स्टेशनवर दररोज अर्धा एक तास गप्पा मारत असतोस, ती कोण?"  मी सहज उत्तर दिले, "मैत्रीण आहे!"  त्यावर त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवून दबक्या आवाजात विचारले, "बिपिन, अशी कोणती ही मैत्रीण आहे, जिच्या बरोबर तुझ्या इतक्या गप्पा रंगतात? मी शांतपणे सांगितले, "माझे असे मित्र सुद्धा आहेत आणि अजून मैत्रिणी सुद्धा आहेत; त्यांच्यासोबत माझे विचार जुळतात, आवडी-निवडी जुळतात आणि मग त्यांच्याशी मी तासन-तास गप्पा मारू शकतो. हो, आणि स्टेशन वर सुद्धा!" मोठ्या भावाचा मित्र खांदे उडवत जाताना म्हणाला, "आम्ही फक्त बसल्यावरच (🥃), आमच्या गप्पा रंगतात.." मूलभूत स्त्री पुरुष मैत्रिणीकडे बघण्याचा दृष्टिकोन कुठेतरी वेगळा होताच, पण आता तो एका बाजूने अधिक मलिन होत चालला आहे. तर दुसऱ्या बाजूने तो दृष्टिकोन सुदृढ दृष्ट्या स्वच्छ होत चालला आहे. तरी, निकोप दृष्टिकोन असणाऱ