Posts

Showing posts from December, 2019

मराठी व्यावसायिका, जागा हो!

Image
  मराठी व्यावसायिका जागा हो!  ग्राहकांकडे लक्ष_उज्वल भविष्य! Customer is the reason, we are in the business! लहान-मोठ्या मराठी उद्योजकांनी, हे ग्राहकांचे महत्व लक्षात ठेवायला हवे व आपल्या कामगार, कर्मचारी तसेच व्यवस्थापनाला समजावयाला हवे. ज्या बलाढ्य उद्योजकांनी बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या मागणीनुसार स्वत:च्या उद्योगाला बदलले नाही, ते हळूहळू काळाच्या पडद्याआड गेले. आपण विकत असलेल्या उत्पादन वा सेवेची किंमत, दर्जा, तत्परता, सहजता, विश्र्वास, प्रतिष्ठा, कार्यसंस्कृती याबरोबरच; 'ग्राहकांशी असलेले नाते' हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. कित्येकदा, कंपनीचे मालक अथवा डायरेक्टर्स, हे समजूतदार, कार्यतत्पर व संवाद_कुशल असतात. पण ग्राहकांशी थेट संपर्कात येणारा कामगार अथवा कर्मचारी वा कित्येकदा व्यवस्थापक, हा सेवा पुरवण्यात कुचराई करणारा असेल व चूक कबूल न करता, कारणांच्या नावाखाली बहाणे देत वाद घालणारा असेल. तर मग, उत्पादन वा सेवेचा दर्जा कितीही चांगला असेल तरीही ग्राहक हळूहळू दूर होण्याची शक्यता वाढते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांसमवेत, एखाद्या चांगल्या रेस्टॉरंट मध्ये जेवणासाठी