Posts

Showing posts from October, 2021

आजार, आधार आणि दृष्टिकोन

Image
 आजार, आधार व दृष्टिकोन: भारतामध्ये एखादी व्यक्ती शारीरिक दृष्ट्या आजारी असेल तर त्याची योग्य रीतीने काळजी घेतली जाण्याची शक्यता असते. परंतु एखादी व्यक्ती मानसिक अथवा भावनिक दृष्ट्या आजारी असेल तर मात्र त्याची काळजी घेतली जायची शक्यता कमी होत जाते. कारण बहुतेक वेळा, अनेक जणांची या दृष्टिकोनातून जडणघडण झालेली नसते. माझ्या एका मित्राकडे गेलो असता, त्याचा मुलगा सांगत होता की त्यांच्या शेजाऱ्याचा मुलगा, त्याचा मित्र, खेळायला येताना सोबत चाकू घेऊन येतो. शाळेतील मुलगा चाकू घेऊन येतो, हे ऐकून सर्वांना धक्का बसला. मी मित्राला सुचवले की, तुझ्या शेजारी राहणाऱ्या पालकांनी, त्यांच्या मुलाचे तज्ञ व्यक्तीकडून समुपदेशन करुन घ्यायला हवे. थोड्या दिवसांनी, माझ्या मित्राने कळवले की, समुपदेशनाचा विषय काढताच, (त्याचे शेजारी, जे उच्च विद्याविभूषित आहेत) भडकले.  जर शिकलेल्या व्यक्तींमध्ये गैरसमज असतील,तर अशिक्षित समाजात काय होत असेल? तुमच्या जवळच्या व्यक्तीमध्ये, खालीलपैकी एखादी वा अधिक लक्षणे आढळली तर तुम्हाला त्यांची विशेष सक्रिय काळजी घ्यावी लागते: १. सतत शांत राहणे किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरुन चिडचिड