Posts

Showing posts from June, 2021

श्रीमंत, गरीब व समृद्ध

Image
 श्रीमंत, गरीब व समृद्ध पैसा अत्यंत महत्वाचा आहे. श्रीमंत किंवा समृद्ध, हे कधीच पैशाला नावे ठेवत नाहीत. फक्त गरीब असलेले, कित्येक जण पैशाला नावे ठेवताना दिसतात, कारण पैसा कमवण्याची त्यांची वृत्ती नसते. व्हाट्सअप वर मेसेज फिरत असतात पैसा म्हणजे कागद आहे त्यापेक्षा मित्र जमा करा. खर आहे, मित्रांची आवश्यकता प्रत्येकाला असते. पण पैशाशिवाय आपली जगातील कामे होणार आहेत काय?  काही वेळेला मेसेज असतो, पैशापेक्षा माणुसकी चांगली! हो कधीही! पण केवळ माणुसकीने कित्येक कामे होत नाहीत. त्या माणुसकीला पैशाची जोड असावी लागते. तुमच्या एखाद्या मित्राला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ आली आणि तुम्ही हॉस्पिटलला सांगितलेत, 'माझ्याकडे खूप माणुसकी आहे. ती जमा करा.' चालेल काय?  मग लक्षात घ्या, पैसा खूप आवश्यक आहे.  फक्त तो किती कमवायचा याच्या मर्यादा आपणच आखून घेतल्या पाहिजेत. त्याबरोबर आपली कर्तबगारी वाढवायला हवी.  पैसा कमावता येत नाही, म्हणून पैशाला नावे ठेवणे चुकीचे आहे.  एकदा दादरमध्ये ग्रीन सिग्नल गाडीला असतानाही, मधून गाडीसमोरुन माणसे जात होती. तेव्हा मी उदगारलो, 'जसे सिग्नल तोडला तर गाडी चालका

३. द्वेष: दुसऱ्याला त्रास व्हावा, म्हणून स्वतःच्या हातावर ठेवलेला निखारा

Image
हेवा, मत्सर व द्वेष: मनात लपलेल्या किंवा जोपासलेल्या ३ भावना लेखक: बिपिन मयेकर © भाग ३. द्वेष:  दुसऱ्याला त्रास व्हावा, म्हणून स्वतःच्या हातावर ठेवलेला निखारा! हेवा तात्कालिक असेल तर तो नैसर्गिक भावनेचे प्रतिक असतो. पण हेवा सातत्याने मनामध्ये मुरत राहिला की, त्याचे मत्सरामध्ये रुपांतर होऊ शकते. 'मत्सर' ही नकारात्मक भावना आहे. पण, द्वेष ही पराकोटीची नकारात्मक भावना आहे. 'द्वेष' ही भावना ज्याच्या मनात शिरते, ती त्याचे आयुष्य खाऊन टाकते. 'द्वेष' करणारी व्यक्ती, स्वतःपेक्षा, ज्या व्यक्तीचा द्वेष करत असते, त्याचाच सतत विचार करत राहते. 'द्वेष' करणाऱ्या व्यक्तीचे, स्वतःचे असे आयुष्य शिल्लक राहत नाही. 'द्वेष', ही एखाद्यासाठी (शक्यतो एकदम जवळच्या वा परिचित व्यक्तीप्रती) तीव्र नापसंतपणाची भावना असते.  त्या व्यक्तीस टाळणे, त्याची मुस्कटदाबी करणे, निंदानालस्ती करणे, त्याच्याबद्दल अफवा पसरवणे किंवा टोकाची भावना म्हणजे त्या व्यक्तीला किंवा त्याच्या प्रतिष्ठेला नष्ट करणे ही इच्छा असते. द्वेष, ही भावना एकदा मस्तकात शिरली की, ती भल्या भल्या व्यक्तींमधील चांगुलपणा

आनंदी आठवणी आठवण्याचे महत्त्व

Image
 तुमच्या भूतकाळातील, किती चांगल्या आठवणी, तुम्हाला आठवत आहेत? आनंदी आठवणी आठवण्याचे महत्त्व: जेव्हा आपण मागे वळून पाहतो आणि चांगला काळ लक्षात ठेवतो, जो आपण इतरांसह अनुभवला आहे, तो आपल्यासाठी वर्तमानकाळात, पुढे जाण्यासाठी आवश्यक ऊर्जा देणारा इंधन बनतो. म्हणूनच, आपल्याला सर्वात कठीण दिवसांचा सामना करण्यास मदत करण्यासाठी, चांगल्या क्षणांच्या आठवणी ठेवणे, फार महत्वाचे आहे. तो चांगला काळ केवळ आपल्याला वादळात आश्रय देणारा शांततेचा नांगर बनतो, असे नाही; तर आशेचा अविश्वसनीय स्रोत देखील बनतो.  आकर्षणाच्या नियमानुसार, तुम्ही जितका चांगला विचार कराल, तितकेच चांगले तुमच्याकडे आकर्षिले जाईल. जर आपण भविष्याकडे आशेने पाहिले तर, जर उद्याचा काळ आपल्याला जगण्यासाठी उपयुक्त असे अनुभव आणेल व आपल्याला सद्यस्थितीत पसरलेल्या काळ्या छायेतून बाहेर पडण्याची शक्ती मिळेल. म्हणून वर्तमानकाळ, सकारात्मक बाबींमध्ये गुंतवणे, हे खूप महत्वाचे आहे. भूतकाळाकडे पूर्ण पाठ न फिरवता, त्यातील चांगल्या व आनंदी क्षणांच्या आठवणी जाग्या करु या.  आपले मन आनंदाने भरुन, भविष्यकाळासाठी, वर्तमानकाळात चांगला विश्वासाचा पाया उभा करु या!

२. मत्सर: मनाला झालेली कावीळ

Image
हेवा, मत्सर व द्वेष: मनात लपलेल्या किंवा जोपासलेल्या ३ भावना लेखक: बिपिन मयेकर © भाग २:  'मत्सर': मनाला झालेली कावीळ कधी कधी रस्त्याने जाताना, एक अत्यंत महागडी, मार्केटमध्ये नवीनच आलेली भपकेदार गाडी बाजूने जाते व तिच्या मालकाचा हेवा वाटतो.. पण कित्येक जणांच्या बाबतीत, तो हेवा क्षणभर टिकतो. ती गाडी निघून गेली की, तो हेवा सुद्धा थोड्या वेळाने निघून जाण्याची शक्यता असते. पण तीच गाडी, ऑफिसमधील एखाद्या सहकाऱ्याची असेल व माणसाचा स्वभाव दुबळा असेल, तर हेवा लोणच्यासारखा, मुरत जाण्याची शक्यता असते. काही स्त्रियांचे, दागिन्यांबाबतीत वा अन्य बाबतीत असे घडू शकते. पण, कधी कधी, मित्रांमधील, ऑफिसमधील, व्यवसायातील वा नात्यांमधील, एखाद्याची प्रगती किंवा त्याच्याकडे वळणारे बहुतेक सर्वांचे लक्ष (attention) डोळ्यात खुपते. कधी त्याची राहण्याची जागा किंवा किंवा त्याचा बोलण्यातून प्रभाव टाकण्याचा अंदाज, तिची सुंदरता, त्याचा रुबाबदारपणा, स्वतःकडे सर्व नियंत्रण (control) ठेवण्याचा अट्टाहास, अशा अनेक बाबतीत 'हेवा' उत्पन्न होऊ शकतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये 'हेवा' हळूहळू वाढू लागतो, ते

१. हेवा: तुलनेतून जन्मणारी भावना

Image
 हेवा, मत्सर व द्वेष: मनात लपलेल्या किंवा जोपासलेल्या ३ भावना लेखक: बिपिन मयेकर © भाग एक: हेवा तुमचे लहानपण कसे गेले होते, याचा तुमच्या व्यक्तीमत्वावर, खास करुन, तुमच्या मनस्थितीवर, फार मोठा प्रभाव झालेला असण्याची दाट शक्यता असते.  तुमच्या लहानपणी जर कुटुंबात, तुमच्याकडे सतत दुर्लक्ष केले गेले होते किंवा तुमच्या इमारतीत वा शाळेमध्ये तुम्हाला, स्वतःकडे लक्ष (attention) हवे होते. पण, तुमच्या भित्र्या स्वभावामुळे, तुम्हाला ते मिळाले नव्हते. अथवा, एकुलती/एकुलता एक असल्यामुळे किंवा आई-वडिलांनी फाजील लाड केल्यामुळे, सतत स्वतःला हवे तेच करण्याची व लक्ष खेचून घेण्याची सवय लागते. वरील दोन्ही प्रकारच्या (यापेक्षा अधिक प्रकार असू शकतात) लहानपणीच्या संगोपनामुळे (upbringing), मोठेपणी न्यूनगंड वा गर्व असलेले व्यक्तीमत्व तयार होत जाते. त्यातून अंतर्गत भिती वाढत जाते. भितीतून तुलना जन्म घेते. यातून 'हेवा' निर्माण होण्याची सहज शक्यता तयार होऊ शकते. हेवा, म्हणजे दुसर्‍याला लाभलेल्या फायद्याबद्दल, असंतोषजनक जाणीव किंवा त्याला होणाऱ्या फायद्याचा त्रास होणे व तसाच समान लाभ घेण्याची इच्छा मनात निर्म