Posts

Showing posts from February, 2022

कस्तुरीमृग

कस्तुरीमृग  कस्तुरीमृगाकडे, स्वतःकडे कस्तुरी (आत्यंतिक सुगंधी पदार्थ) असतो; पण त्याला स्वतःला त्याची जाणीव नसते. आपल्या माणसांमध्ये सुद्धा अशा कस्तुरीमृग असलेल्या व्यक्ती असतात.  जेव्हा एखादी व्यक्ती, स्वतःमध्ये असलेली क्षमता, गुण, कौशल्य व त्यांच्यामुळे आयुष्यात मिळू शकणारे प्रचंड लाभ व होणारे स्वहित ओळखू शकत नाही; तेव्हा ती व्यक्ती कस्तुरी मृगासारखीच असते. कस्तुरीमृग भितीमुळे लपून राहतात. माणसांतील अशा व्यक्ती स्वतः निर्माण केलेल्या भितीच्या आवरणात दडून बसतात.  त्यामुळे त्यांची, स्वतःच्या गुणवत्तेच्या अज्ञानामुळे व भितीच्या दडपणाखाली, चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाढते. यातूनच, त्यांच्या आयुष्याला चुकीची दिशा मिळते व आयुष्याचे गणित चुकत जाते. शांतपणे, आता, तुम्ही जे आयुष्य जगत आहात, त्यात तुमच्याकडे असलेल्या क्षमतेचा, गुणांचा व कौशल्यांचा; खरोखरच योग्य फायदा मिळतो आहे काय, याचा विचार करा. विश्लेषण करा.  जर, तुमची योग्यता जास्त असेल, तर तुमच्या योग्यतेला, (आर्थिक व कार्यक्षमता) न्याय देणाऱ्या संधी शोधा. पण संयम ठेवा. सातत्य ठेवा. जिद्द व चिकाटी ठेवा. यश तुमचेच असेल. खूप साऱ्या शुभेच्

व्हॅलेंटाईन डे/आठवडा

Image
  प्रेम  काल चालतानाचा अनुभव: नेहमीप्रमाणे संध्याकाळी सांगण्यासाठी गेलो असताना, एका ठराविक ठिकाणी, जिथे तरुण वर्ग बसून गप्पा मारत असतात, तिथे थोड्या अंतरावरुन लक्ष गेले. तीन टिनेजर मित्र, (साधारण सतरा-अठरा वयाचे असावेत) एकत्र बसून जोरजोरात हसत खिदळत होते. त्यांचा हास्यकल्लोळ मला लांबून ऐकू येत होता व त्यांच्या चेहर्‍यावरचे हास्य दिसत होते. इतक्यात दुसऱ्या बाजूने, त्यांच्याच वयाचे जोडपे येताना दिसले. त्यांच्यापाठोपाठ दुसरे जोडपे होते. त्या तरुण मुला-मुलींना एकत्र पाहून या तीन मित्रांच्या चेहर्‍यावरचे हास्य मावळले. ती मुले शांत झालेली दिसत होती. मी जेव्हा त्यांच्या बाजूने पास झालो तेव्हा त्यांच्याशी चर्चा सुरू होती, "काय यार, आज आपल्या प्रत्येकाबरोबर कुणीच मुलगी नाही." पण, त्याअगोदर माझ्या बाजूने जे टिनेजर जोडपे निघून गेले, त्यांच्यात वादविवाद सुरु होता. त्याला अहंकाराची झालर असावी, दोघांच्याही कडून.. दुसरे जोडपे पास झाले; तेव्हा लक्षात आले, यांच्यामध्ये फक्त मैत्री आहे. ती दोघे शांतपणे गप्पा मारत निघून गेले. तिघेही आरामात हसत खेळत होते, परंतु समोरुन जाणार्‍या जोडप्यांना

मनातलं

Image
  मनातलं काउंसलिंग सेशन सुरू होते. प्रश्न विचारल्यावर मारियाची मान खाली गेली. तिने जेव्हा मान उचलली, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर थोडेसे का होईना, वेगळे हावभाव होते. तिच्या डोळ्यांची किंचित हालचाल झाली.  (नाव बदलले आहे) मी तिला सांगितले, "या प्रश्नाने तुला त्रास होत असेल, तर आपण वेगळ्या विषयाकडे जाऊ या. जेव्हा तुझी मानसिक व भावनिक तयारी असेल, त्यावेळेस आपण या विषयावर पुढील चर्चा करु या." आता मारियाच्या चेहर्‍यावर थोडे आश्चर्याचे भाव होते. तिने घाबरत विचारले, "तुम्हाला कसे समजले?  मी शांतपणे तिला समजावले, "सध्या ते महत्वाचे नाही आपण आपल्या काऊंसलिंग सेशन कडे वळू या." नंतर, प्रत्येक प्रश्नावर, मारियाच्या मनःस्थितीला ओळखत, मी प्रश्नांचा ओघ वळवत राहिलो. मारियाला आता ते समजू लागले होते. सेशन पूर्ण झाल्यावर मारिया शांत व स्थिर झाली होती. तिच्या समस्यांची उत्तरे, तिने शोधून काढली होती. त्या प्रक्रियेत मी फक्त तिला मदत केली होती. निघताना मारिया थोडे पुढे जाऊन, परत थांबली.  मी विचारले, "अजून काही समस्या आहेत काय?" तिने ठामपणे नाही सांगितले, आणि आत्मविश्वासाने मला व