Posts

Showing posts from March, 2022

मैत्रीत राजकारण नको, राजकारणात मैत्री करा.

 . . "मैत्रीत राजकारण नको. राजकारणात मैत्री करा." राजकीय सल्लागार' होण्यासाठी ज्यांनी मला मार्गदर्शन केले, त्यांनी मला हा सल्ला दिला होता. आज जवळच्या नात्यांमध्ये मित्र-मैत्रिणी मध्ये राजकारणातील स्वतःच्या मतांबद्दल अट्टाहास धरला जात आहे; दुराग्रह केला जात आहे. कित्येकदा हे पक्षीय राजकारण असतं, तर कधी धर्माचं किंवा जातीचं राजकारण असतं.. लहानपणी, आम्हां मित्रमैत्रिणींना, 'जात' माहित नव्हती; 'धर्म' चर्चेत नव्हता. आज चित्र थोडेफार का होईना, बदलत चालले आहे. आज, लहानपणी ज्यांनी घट्ट मैत्रीमध्ये, जातीधर्माचा विचार केला नव्हता, त्याच मित्रमैत्रिणींमध्ये, जातीनुसार किंवा अहंकाराच्या पार्श्वभूमीवर ग्रुप्स बनत गेले आहेत. तर इतर सामाजिक मित्रमैत्रिणींमध्ये, आपापल्या धर्मावरुन (केवळ हिंदू नव्हे) आग्रही भूमिका घेणे, सुरु झाले आहे. यावर, वॉट्सॲप युनिव्हर्सिटी व राजकारणाची गडद छाप जाणवते.  मैत्रीमध्ये राजकीय पक्षांच्या धोरणांचे पडसाद उमटत आहेत. आज आबालवृद्ध सर्वांनीच विचार करायला हवा, की आपण जी मते सोशल मिडियामध्ये व्यक्त करता, त्यांचा आपल्याकडे स्वतःचा तर्कशुद्ध आधार आह

कोळी, जिद्द आणि तुम्ही..!

 जाळं विणताना, कोळी सहा वेळा खाली पडला.. अयशस्वी झाला.. पण सातव्यांदा, त्या कोळ्याने परत झेप घेतली व आपले जाळे पूर्ण केले. ते प्रत्येक अयशस्वी प्रयत्न पाहत, कोळ्याबरोबर, स्वतःला सहानुभूती देत असलेला, स्कॉटलंडचा रॉबर्ट द ब्रूस, कोळ्याचा सातवा यशस्वी प्रयत्न पाहून अचंबित झाला. तो स्वतः सहा वेळा, क्रांतीचा सहा वेळा अयशस्वी प्रयत्न करुन निराश बसला होता. पण, त्या एवढ्याशा छोट्या कोळ्याने, त्याला जिद्द-चिकाटी शिकवली व रॉबर्ट द ब्रूस, परत सज्ज झाला. तुम्ही काय करत आहात? प्रयत्न सोडून, आहे ते मान्य करुन, गप्प बसला आहात? दिवस ढकलत आहात? की, तुमच्या जिद्द व चिकाटीने, प्रयत्न करत आहात? चला, होऊ या प्रसन्न! बिपिन मयेकर लेखक

निरागसपणा, कितपत असावा?

Image
आमच्या कुटुंबाची पालकत्वाच्या नात्याने काळजी घेणारे, माझे वरिष्ठ मित्र, यांनी हल्लीच निरागसतेवरुन मस्करी केली. मी हसत हसत उत्तर दिले, "मी निरागस नाही." माझ्या पत्नीने नंतर विचारले, "तुम्ही असं कशासाठी बोललात?" माझ्या मते, 'निरागस म्हणजे ज्याला काही कळत नाही.. याउलट, मला Subconscious Mind Reader म्हणून समोरच्या व्यक्तीचे हेतू व भावना समजतात. म्हणून मी निरागस नाही. हो, पण, मी समोरील व्यक्तीच्या मनातील ओळखले, तरी मी त्याचा कधीच फायदा घेतला नाही, उलट काही वेळा माझा फायदा घेऊ दिला. पण, त्याची जबाबदारी माझीच होती व आहे. ते माझे निर्णय होते व ती माझी प्राथमिकता होती. आपल्या निर्णयांना व प्राथमिकतांना, आपणच जबाबदार असतो.  माझ्या आयुष्यावर, अनेक मोठ्या व्यक्तींचा प्रभाव आहे. माझ्या एका प्रभावी व आवडत्या लेखकांनी (आज ते हयात नाहीत), त्यांच्या वडिलांबद्दल सांगितले होते. "त्यांच्या वडिलांना, अनेक जण फसवत होते. एकदा, वडिलांच्या मित्राने विचारले, इतके जण, तुमचा हवा तेव्हा, हवा तसा फायदा घेतात. त्यातील काही जण तुम्हाला फसवतात, तुम्हाला वाईट नाही वाटत? वडिलांनी उत्तर दिले,

स्त्री_पुरुष

 माझी मते: काही वर्षांपूर्वी, मी जिन्यावरुन धावत खाली प्लॅटफॉर्मवर येऊन, नुकतीच सुरु झालेली ट्रेन पकडली. थोडा श्वास घेतल्यानंतर, लक्षात आले की, मी महिलांच्या बाजूच्या डब्यात होतो. मध्येच जी जाळी होती, तिथे काही पुरुष बांधव आपल्या डोळ्यांचे कॅमेरे लावून उभे होते. महत्वाची बाब म्हणजे, तो रक्षाबंधनाचा दिवस होता. बहुतेक सर्वांच्या हातावर राखी बांधलेली होती. मी दरवाजाजवळ उभा राहिलो. उतरणाऱ्या कॅमेरा लावून बघणाऱ्या पुरुषांबद्दल एक अपेक्षा होती की, त्यांची बहीण बाजूच्या डब्यात होती, म्हणून ते काळजीपोटी तेथे उभे होते. पण मी उतरेपर्यंत, एकाही पुरुषाला बाजूच्या डब्यातील मुलगी वा स्त्री भेटली नाही. याचा अर्थ, सर्व पुरुष असे आहेत व कोणतीही मुलगी अथवा स्त्री, अशी नाही; असा होत नाही. यातही आता स्पर्धा सुरु झाली आहे. अर्थात अजून तरी पुरुषांचे प्रमाण जास्त आहे. मी नाशिक येथे 'महाराष्ट्र पोलीस' दलातील अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण घ्यायला गेलो होतो, तेव्हा दोन तरुण महिला ट्रेनर्स मला भेटायला आल्या होत्या. थोड्या गप्पा झाल्यानंतर, त्यांनी मला एक प्रश्न विचारला, "सर, sex म्हणताच तुमच्या मनात कोणत