आनंदी आठवणी आठवण्याचे महत्त्व

 तुमच्या भूतकाळातील, किती चांगल्या आठवणी, तुम्हाला आठवत आहेत?


आनंदी आठवणी आठवण्याचे महत्त्व:



जेव्हा आपण मागे वळून पाहतो आणि चांगला काळ लक्षात ठेवतो, जो आपण इतरांसह अनुभवला आहे, तो आपल्यासाठी वर्तमानकाळात, पुढे जाण्यासाठी आवश्यक ऊर्जा देणारा इंधन बनतो.


म्हणूनच, आपल्याला सर्वात कठीण दिवसांचा सामना करण्यास मदत करण्यासाठी, चांगल्या क्षणांच्या आठवणी ठेवणे, फार महत्वाचे आहे.


तो चांगला काळ केवळ आपल्याला वादळात आश्रय देणारा शांततेचा नांगर बनतो, असे नाही; तर आशेचा अविश्वसनीय स्रोत देखील बनतो. 


आकर्षणाच्या नियमानुसार, तुम्ही जितका चांगला विचार कराल, तितकेच चांगले तुमच्याकडे आकर्षिले जाईल.


जर आपण भविष्याकडे आशेने पाहिले तर, जर उद्याचा काळ आपल्याला जगण्यासाठी उपयुक्त असे अनुभव आणेल व आपल्याला सद्यस्थितीत पसरलेल्या काळ्या छायेतून बाहेर पडण्याची शक्ती मिळेल.


म्हणून वर्तमानकाळ, सकारात्मक बाबींमध्ये गुंतवणे, हे खूप महत्वाचे आहे. भूतकाळाकडे पूर्ण पाठ न फिरवता, त्यातील चांगल्या व आनंदी क्षणांच्या आठवणी जाग्या करु या. 


आपले मन आनंदाने भरुन, भविष्यकाळासाठी, वर्तमानकाळात चांगला विश्वासाचा पाया उभा करु या!


आपलाच,

बिपिन मयेकर

Comments

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?