Posts

Showing posts from May, 2020

पालकत्व

Image
मुलांच्या भविष्यकाळातील आठवणींमध्ये स्थान हवे असेल तर त्यांच्या आजच्या क्षणांमध्ये सहभागी व्हायला हवे. आईवडिलांचा वर्तमानकाळ समजावून घेण्यासाठी, मुलांना त्यांच्या भूतकाळात डोकावून बघावे लागेल. कित्येक वेळेला, आईवडिलांना एका बाजूला आपल्या मुलांचे भविष्य तर दुसऱ्या बाजूला, स्वतःच्या भूतकाळातील चुका दिसत असतात. स्वतःच्या भूतकाळातील त्याच चुका, आपल्या मुलांनी वर्तमानकाळात करु नये, अशी तळमळ असते. बहुतेक वेळा, हेतू चांगलाच असतो पण पद्धत चुकते. तर कधी कधी, एखाद्याच्या (मुलांच्या किंवा आई/वडिलांच्या) समजूतदारपणाला गृहित धरले जाऊ शकते. आईवडिल/मुले; दोघांनीही वर्तमानकाळात, हेकटपणा न करता वा भावनांच्या आहारी न जाता, *योग्य भविष्यकाळ* यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे. ~ बिपीन मयेकर

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

Image
यावर एका मित्राने विचारले, "तारतम्य म्हणजे फक्त एव्हढेच काय?" मला सांगावे लागले, "अरे, हे फक्त संवादातील एका कोनावर आधारित आहे. पण तरीही यातील गाभा तारतम्याच्या व्याख्येला लागू होतो. तो म्हणजे स्वत:च्या क्षमता व मर्यादा यांची योग्य जाणीव!" कुठे व किती पुढे व्हायचे आणि कुठे व किती वेळ थांबायचे; हे नोकरी/व्यवसाय असो वा नातेसंबंध; राजकारण असो वा छंद; हे उमगले_समजले की एक तर प्रगती होते व परिस्थिती विपरित असेल तर अधोगती होत नाही. श्री. अमिताभ बच्चन यांनी हिरोचे रोल करताना, अनेक जबरदस्त सुपरहिट चित्रपट दिले होते. पण नंतर त्यांचे वय वाढू लागले, तरीही हिरोचे चित्रपट करणे सुरु होते. परिणामी चित्रपट फ्लॉप होऊ लागले. त्यांनी पॉझ घेऊन, हळूहळू चरित्र भूमिकांकडे रोख वळवला. आणि त्यात त्यांना प्रचंड यश मिळू लागले. त्यांच्या समकालीन नायकांना त्यांच्याइतके यश मिळालेले नाही. नोकरी करणाऱ्या, अनेक जणांनी थांबून विचारपूर्वक नियोजन करुन व्यवसाय सुरु करुन प्रचंड यश मिळवले आहे. पण काही जणांनी, 'उद्योजक व्हायचं आहे' या भरात, अतिउत्साहाने आपली निवृत्तीनंतरची सर्व रक्कम अर