कस्तुरीमृग

कस्तुरीमृग

 कस्तुरीमृगाकडे, स्वतःकडे कस्तुरी (आत्यंतिक सुगंधी पदार्थ) असतो; पण त्याला स्वतःला त्याची जाणीव नसते. आपल्या माणसांमध्ये सुद्धा अशा कस्तुरीमृग असलेल्या व्यक्ती असतात.


 जेव्हा एखादी व्यक्ती, स्वतःमध्ये असलेली क्षमता, गुण, कौशल्य व त्यांच्यामुळे आयुष्यात मिळू शकणारे प्रचंड लाभ व होणारे स्वहित ओळखू शकत नाही; तेव्हा ती व्यक्ती कस्तुरी मृगासारखीच असते.


कस्तुरीमृग भितीमुळे लपून राहतात. माणसांतील अशा व्यक्ती स्वतः निर्माण केलेल्या भितीच्या आवरणात दडून बसतात. 


त्यामुळे त्यांची, स्वतःच्या गुणवत्तेच्या अज्ञानामुळे व भितीच्या दडपणाखाली, चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता वाढते. यातूनच, त्यांच्या आयुष्याला चुकीची दिशा मिळते व आयुष्याचे गणित चुकत जाते.


शांतपणे, आता, तुम्ही जे आयुष्य जगत आहात, त्यात तुमच्याकडे असलेल्या क्षमतेचा, गुणांचा व कौशल्यांचा; खरोखरच योग्य फायदा मिळतो आहे काय, याचा विचार करा. विश्लेषण करा. 


जर, तुमची योग्यता जास्त असेल, तर तुमच्या योग्यतेला, (आर्थिक व कार्यक्षमता) न्याय देणाऱ्या संधी शोधा. पण संयम ठेवा. सातत्य ठेवा. जिद्द व चिकाटी ठेवा.


यश तुमचेच असेल.


खूप साऱ्या शुभेच्छांसह,

बिपिन मयेकर

वैयक्तिक मार्गदर्शक

कॉर्पोरेट ट्रेनर, मॅनेजमेंट सल्लागार व बिझनेस कोच

भारतात प्रथम व जगात तिसऱ्या अधिकृत निवडलेले

NLP GOLD MASTER Trainer, NFNLP USA 

7021508470



Comments

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?