Posts

Showing posts from October, 2019

मुलांना बिघडवतंय कोण?

नमस्कार,  कबड्डी, लंगडी, आट्यापाट्या, चोरपोलीस, लपाछपी; असे 'अवखळ आनंदी बालपण' जगले होते, त्यातील किती जणांनी आपल्या मुलांना (कदाचित हेच खेळ नसतील) असाच अवखळ आनंद लुटण्यासाठी 'खुले वातावरण' दिले आहे? निव्वळ वस्तू म्हणजे प्रेम नव्हे. केवळ "मला मिळाले नव्हते, ते तुला घे!" यातून नात्यांकडे दुर्लक्ष करणारी उपभोगवादी प्रवृत्ती निर्माण होत जाते. स्वातंत्र्याला जबाबदारीची जोड नसेल तर बेफिकीर वृत्ती घडत जाते. लहानपणी प्रत्येकी पाच पैसे काढून पाच मित्र, अर्ध्या तासासाठी सायकल भाड्याने आणत होते. त्या पाच पैशाचे महत्त्व वाटत होते. कारण त्या पाच पैशांच्या किमतीपेक्षा, त्यांचे मूल्य समजत होते. हल्ली जरा हट्ट केल्यावर, घेऊन दिलेली, चाळीस हजारांची मोटर सायकल सुद्धा बेफिकीरीने चालवली जाते. मुलं बिघडत नसतात, तर आपण बिघडवत असतो. काही पालकांकडे, मुलांना द्यायला बक्कळ पैसे असतात, पण पुरेसा वेळ मात्र नसतो. याउलट काही पालक, आपले आयुष्य मुलांशी बांधून घेतात. त्यांचा शक्य तितका वेळ ते मुलांसोबतच घालवतात. मुलांना श्र्वास घ्यायला सुद्धा स्वतंत्र वेळ देत नाहीत. मुलांच्या