Posts

Showing posts from April, 2020

करु ना, पुन्हा सुरुवात!

Image
नेहमीचा प्रश्न, "जगताय ना?" किडेमुंग्या व प्राणीपक्षी फक्त जिवंत राहण्यासाठी धडपड करतात, तर मनुष्य 'आयुष्य' अर्थपूर्ण जगून सार्थकी लावू शकतो. पण आज त्याअगोदर, 'जिवंत' राहण्याची कसरत करावी लागते आहे. निसर्गाने परत आपली ताकद दाखवून दिली आहे. एका विषाणूने सर्व जगाला बंदिस्त करुन टाकले आहे. या आवश्यक बंदिस्तपणाला प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सामोरा जात आहे. काही अशिक्षित लोकांना अज्ञानामुळे व परिस्थितीमुळे गिचमिडीत राहणाऱ्यांना, रोगाला आमंत्रण द्यावे लागले आहे. तर काही सुशिक्षित पण असंस्कृत माणसांच्या अतिआत्मविश्वासामुळे, समाजाला धोका निर्माण झाला आहे. आज आपल्यासाठी बाहेर पडलेल्या पोलीसांना, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना, सफाई कामगारांना रोग ग्रासतो आहे. काही जण बळी पडले आहेत. निदान त्यांच्या हौतात्म्याचा व त्यांच्या कुटुंबियावर झालेल्या आघाताचा आदर करुन तरी या शायनिंग शूरवीरांनी काळजी घ्यायला हवी. आपण सर्वांनी त्या हुतात्म्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करायला हवी. आपण ज्यांनी हा सावधपणा, स्वसंर‌क्षणार्थ मान्य केला आहे, त्यांचा आता वर्तमानकाळ कसा