Posts

Showing posts from July, 2021

खोटी प्रशंसा, निंदा व विधायक टिका

Image
 खोटी प्रशंसा, निंदा व विधायक टिका! - बिपीन मयेकर (लेखक) प्रत्येकाला, आपले वागणेबोलणे मान्य असेल किंवा पटेल, हे शक्य नाही. पण, त्यामुळे वाईट वाटून घेण्याचे काहीही कारण नाही. आपण आपल्या शब्दांची व कृतींची कितीही काळजी घेतली, तरी त्याकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन सारखा नसणार. *प्रत्येक जण स्वतःच्या दृष्टिकोनातून, आपल्या वागण्याबोलण्याचा अर्थ लावत असतो.* कित्येक जणांचे व्यक्त होणे, हे खूपच विचित्र किंवा विक्षिप्त असते. काही जणांचा, *अंतस्थ हेतू वेगळा* असतो. काही जण, *आपल्यावरील अतिप्रेमामुळे/आपुलकीमुळे, सत्य परिस्थितीकडे डोळेझाक करत, चुकीची प्रशंसा करतात.* आपण जेव्हा आपल्या अंतस्थ प्रामाणिक हेतू बाबतीत जागरुक असतो, तेव्हा आपल्या हातून खोटी प्रशंसा किंवा निंदा होत नाही.  खोटी/चुकीची प्रशंसा, तुम्हाला चुकीच्या भावविश्वात नेऊ शकते. तुमच्या समोर एक मृगजळ निर्माण करु शकते. *खोट्या/चुकीच्या प्रशंसेमुळे, सत्य व वास्तव परिस्थितीचे आकलन होत नाही. आपण बेसावध होऊ शकतो.* ज्याचा उपयोग विरोधक करु शकतात. माझ्या राजकीय व्याख्यानांमध्ये मी नेहमी सांगतो, *इतर बादशहांकडे खोटी प्रशंसा करणारे, अवतीभवती होत