Posts

पालकत्व

Image
मुलांच्या भविष्यकाळातील आठवणींमध्ये स्थान हवे असेल तर त्यांच्या आजच्या क्षणांमध्ये सहभागी व्हायला हवे. आईवडिलांचा वर्तमानकाळ समजावून घेण्यासाठी, मुलांना त्यांच्या भूतकाळात डोकावून बघावे लागेल. कित्येक वेळेला, आईवडिलांना एका बाजूला आपल्या मुलांचे भविष्य तर दुसऱ्या बाजूला, स्वतःच्या भूतकाळातील चुका दिसत असतात. स्वतःच्या भूतकाळातील त्याच चुका, आपल्या मुलांनी वर्तमानकाळात करु नये, अशी तळमळ असते. बहुतेक वेळा, हेतू चांगलाच असतो पण पद्धत चुकते. तर कधी कधी, एखाद्याच्या (मुलांच्या किंवा आई/वडिलांच्या) समजूतदारपणाला गृहित धरले जाऊ शकते. आईवडिल/मुले; दोघांनीही वर्तमानकाळात, हेकटपणा न करता वा भावनांच्या आहारी न जाता, *योग्य भविष्यकाळ* यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे. ~ बिपीन मयेकर

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

Image
यावर एका मित्राने विचारले, "तारतम्य म्हणजे फक्त एव्हढेच काय?" मला सांगावे लागले, "अरे, हे फक्त संवादातील एका कोनावर आधारित आहे. पण तरीही यातील गाभा तारतम्याच्या व्याख्येला लागू होतो. तो म्हणजे स्वत:च्या क्षमता व मर्यादा यांची योग्य जाणीव!" कुठे व किती पुढे व्हायचे आणि कुठे व किती वेळ थांबायचे; हे नोकरी/व्यवसाय असो वा नातेसंबंध; राजकारण असो वा छंद; हे उमगले_समजले की एक तर प्रगती होते व परिस्थिती विपरित असेल तर अधोगती होत नाही. श्री. अमिताभ बच्चन यांनी हिरोचे रोल करताना, अनेक जबरदस्त सुपरहिट चित्रपट दिले होते. पण नंतर त्यांचे वय वाढू लागले, तरीही हिरोचे चित्रपट करणे सुरु होते. परिणामी चित्रपट फ्लॉप होऊ लागले. त्यांनी पॉझ घेऊन, हळूहळू चरित्र भूमिकांकडे रोख वळवला. आणि त्यात त्यांना प्रचंड यश मिळू लागले. त्यांच्या समकालीन नायकांना त्यांच्याइतके यश मिळालेले नाही. नोकरी करणाऱ्या, अनेक जणांनी थांबून विचारपूर्वक नियोजन करुन व्यवसाय सुरु करुन प्रचंड यश मिळवले आहे. पण काही जणांनी, 'उद्योजक व्हायचं आहे' या भरात, अतिउत्साहाने आपली निवृत्तीनंतरची सर्व रक्कम अर...

करु ना, पुन्हा सुरुवात!

Image
नेहमीचा प्रश्न, "जगताय ना?" किडेमुंग्या व प्राणीपक्षी फक्त जिवंत राहण्यासाठी धडपड करतात, तर मनुष्य 'आयुष्य' अर्थपूर्ण जगून सार्थकी लावू शकतो. पण आज त्याअगोदर, 'जिवंत' राहण्याची कसरत करावी लागते आहे. निसर्गाने परत आपली ताकद दाखवून दिली आहे. एका विषाणूने सर्व जगाला बंदिस्त करुन टाकले आहे. या आवश्यक बंदिस्तपणाला प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सामोरा जात आहे. काही अशिक्षित लोकांना अज्ञानामुळे व परिस्थितीमुळे गिचमिडीत राहणाऱ्यांना, रोगाला आमंत्रण द्यावे लागले आहे. तर काही सुशिक्षित पण असंस्कृत माणसांच्या अतिआत्मविश्वासामुळे, समाजाला धोका निर्माण झाला आहे. आज आपल्यासाठी बाहेर पडलेल्या पोलीसांना, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना, सफाई कामगारांना रोग ग्रासतो आहे. काही जण बळी पडले आहेत. निदान त्यांच्या हौतात्म्याचा व त्यांच्या कुटुंबियावर झालेल्या आघाताचा आदर करुन तरी या शायनिंग शूरवीरांनी काळजी घ्यायला हवी. आपण सर्वांनी त्या हुतात्म्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करायला हवी. आपण ज्यांनी हा सावधपणा, स्वसंर‌क्षणार्थ मान्य केला आहे, त्यांचा आता वर्तमानकाळ कसा ...

छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा कसा पुढे चालवणार?

Image
हॉस्पिटलमधून परत येताना पाहिले, माझे एक परिचित गृहस्थ, त्यांच्या मित्रांसह उभे होते. सगळे जण एकमेकांना खेटून उभे होते. काही जणांचे, एकमेकांच्या गळ्यात हात होते. सदर परिचित गृहस्थ, छत्रपती शिवाजी महाराजांचे परम भक्त आहेत. मला घरी परतताना, महाराजांचे किल्लेदाराला लिहिलेले पत्र आठवले. मी शाळेत असताना, आमच्या मराठीच्या शिक्षिकांनी ते पत्र इतक्या छान पद्धतीने शिकवले होते की ते पत्र पण लक्षात आहे व त्यातील मतितार्थ! छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्लेदारास पत्रात बजावले होते: दिवसरात्र कडा सूक्ष्म पहारा ठेवा. तेलाच्या आमीषाने, उंदीर गडावरील दिव्यांतील तेलाची वात पळवतील. जर ती जळती वात धान्य_आगर किंवा शस्त्रागारावर पडली, तर अनर्थ होईल. धान्य_आगर पेटले व धान्य जळून खाक झाले तर सैनिकांना खायला काय देणार? उपाशी पोटी सैन्य कसे लढणार? तसेच शस्त्रागारावर जळती वात पडली व दारुगोळ्याचा स्फोट होऊन शस्त्रे नष्ट झाली तरी सुद्धा किल्ला राखायला जड जाईल. इतका सूक्ष्म विचार करणाऱ्या व सावध असणाऱ्या द्रष्ट्या महाराजांचे आपण नाव घेत असू, तर आपण किती सावध असायला हवे? आपण खरोखरच सूक्ष्म विचार करत आहोत काय?...

चला होऊ या हिरकणी!

Image
जागतिक महिला दिनानिमित्त चला, होऊ या हिरकणी! रायगडाच्या पायथ्याखाली असणारे एक वाळेसर नावाचे छोटेसे गाव…. त्या गावातील एक धनगर कुटूंब. कुटूंबाचा उदरनिर्वाह घरातील गुरांचे दुधावर चाले…. घरातील दुध गडावर घेऊन जाण्याचे काम ह्या घरातील स्त्री हिरा करायची…. *तुम्ही कोण आहात, यापेक्षा तुम्हाला काय मिळवायचे आहे; ते जास्त महत्त्वाचे असते.* हिरा ही एका तान्हुल्याची माता. त्या दिवशी पण ती गडावर पोहचली दुध विकायला. पण संध्याकाळ होऊन गेली. आता तिच्या लक्षात आले की गडाचे दरवाजे बंद झाले असणार. रायगडावर जाण्यायेण्यासाठी फक्त मुख्य दरवाजा…. *कित्येकदा तुम्हाला ज्या मार्गाने यश मिळणार, यांची खात्री असते, तो मार्गच बंद होतो.* रायगडाचे दरवाजे बंद झाले की फक्त वारा आणि पाऊसच गडावर पोहचायचा. हिरा जाऊन दरवाज्या जवळ असणार्‍या शिपायांना विनवणी करू लागली. पण काही उपयोग झाला नाही. *आता यापुढे काहीच शक्य नाही, असे वाटते.* तिला गडावरून घरी जाणं गरजेच होतं. तिचा तान्हुला तिची वाट पाहत होता. तान्ह बाळ आई शिवाय किती वेळ राहणार होते… ह्या मातेला आता डोळ्यासमोर फक्त बाळाचा चेहरा दिसत होता…. आता कुठल्य...

मराठी व्यावसायिका, जागा हो!

Image
  मराठी व्यावसायिका जागा हो!  ग्राहकांकडे लक्ष_उज्वल भविष्य! Customer is the reason, we are in the business! लहान-मोठ्या मराठी उद्योजकांनी, हे ग्राहकांचे महत्व लक्षात ठेवायला हवे व आपल्या कामगार, कर्मचारी तसेच व्यवस्थापनाला समजावयाला हवे. ज्या बलाढ्य उद्योजकांनी बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या मागणीनुसार स्वत:च्या उद्योगाला बदलले नाही, ते हळूहळू काळाच्या पडद्याआड गेले. आपण विकत असलेल्या उत्पादन वा सेवेची किंमत, दर्जा, तत्परता, सहजता, विश्र्वास, प्रतिष्ठा, कार्यसंस्कृती याबरोबरच; 'ग्राहकांशी असलेले नाते' हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. कित्येकदा, कंपनीचे मालक अथवा डायरेक्टर्स, हे समजूतदार, कार्यतत्पर व संवाद_कुशल असतात. पण ग्राहकांशी थेट संपर्कात येणारा कामगार अथवा कर्मचारी वा कित्येकदा व्यवस्थापक, हा सेवा पुरवण्यात कुचराई करणारा असेल व चूक कबूल न करता, कारणांच्या नावाखाली बहाणे देत वाद घालणारा असेल. तर मग, उत्पादन वा सेवेचा दर्जा कितीही चांगला असेल तरीही ग्राहक हळूहळू दूर होण्याची शक्यता वाढते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांसमवेत, एखाद्या चांगल्या रेस्टॉरंट मध्ये जेवणासाठ...

स्वत:च्या वागण्याचे समर्थन किंवा विश्लेषण?

Image
असे होते काय तुमच्या बाबतीत? तुम्हाला ज्या व्यक्तीचे वागणे पटत नाही, त्या व्यक्तीला मात्र, स्वत:चे वागणे बरोबर वाटत असते. असे स्वत:च्या बाबतीत सुद्धा होऊ शकते. जेव्हा एखादी व्यक्ती स्वत:च्या वागण्याचे फक्त आणि फक्त समर्थन करते, व स्वत:चे अजिबात विश्लेषण करत नाही, तेव्हा अशी व्यक्ती एकतर स्वत:ला सतत सहानुभूती देत राहते, किंवा समोरच्या व्यक्तीच्या चुका शोधत राहते; वा दोन्ही करत राहते. सासू_सून, सासू_जावई, आई-वडील_मुले, पती_पत्नी, भाऊ_भाऊ/बहीण, मित्र_मित्र/मैत्रीण असे वा इतर नाते, यात अशा विश्लेषण न करता, केवळ स्व:समर्थन करणाऱ्या व्यक्तीचा समावेश असेल तर त्या नात्यात काय घडत असेल? आणि नात्यातील दोघांनाही 'माझेच बरोबर' करायची सवय असेल तर चित्र उभे करा, काय महाभारत घडू शकत असेल? एकतर अश्या नात्यांमध्ये वादविवाद घडत राहतात किंवा ही नाती अलिप्त होतात. सतत स्वत:चेच समर्थन करणाऱ्या व्यक्तीचे शक्यतो कुणाशीही पटत नाही, घरी, अॉफिसमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये, शेजाऱ्यांशी! कारण समोरच्या व्यक्तीची बाजू समजून घेण्याची व स्वत:ची बाजू तपासण्याची यांची तयारी नसते. विश्लेषण करण्याच...