पालकत्व


मुलांच्या भविष्यकाळातील आठवणींमध्ये स्थान हवे असेल तर त्यांच्या आजच्या क्षणांमध्ये सहभागी व्हायला हवे.

आईवडिलांचा वर्तमानकाळ समजावून घेण्यासाठी, मुलांना त्यांच्या भूतकाळात डोकावून बघावे लागेल.

कित्येक वेळेला, आईवडिलांना एका बाजूला आपल्या मुलांचे भविष्य तर दुसऱ्या बाजूला, स्वतःच्या भूतकाळातील चुका दिसत असतात.

स्वतःच्या भूतकाळातील त्याच चुका, आपल्या मुलांनी वर्तमानकाळात करु नये, अशी तळमळ असते.

  • बहुतेक वेळा, हेतू चांगलाच असतो पण पद्धत चुकते. तर कधी कधी, एखाद्याच्या (मुलांच्या किंवा आई/वडिलांच्या) समजूतदारपणाला गृहित धरले जाऊ शकते.

आईवडिल/मुले; दोघांनीही वर्तमानकाळात, हेकटपणा न करता वा भावनांच्या आहारी न जाता, *योग्य भविष्यकाळ* यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे.

~ बिपीन मयेकर

Comments

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?