मराठी व्यावसायिका, जागा हो!
मराठी व्यावसायिका जागा हो!
ग्राहकांकडे लक्ष_उज्वल भविष्य!
Customer is the reason, we are in the business!
लहान-मोठ्या मराठी उद्योजकांनी, हे ग्राहकांचे महत्व लक्षात ठेवायला हवे व आपल्या कामगार, कर्मचारी तसेच व्यवस्थापनाला समजावयाला हवे.
ज्या बलाढ्य उद्योजकांनी बदलत्या काळानुसार ग्राहकांच्या मागणीनुसार स्वत:च्या उद्योगाला बदलले नाही, ते हळूहळू काळाच्या पडद्याआड गेले.
आपण विकत असलेल्या उत्पादन वा सेवेची किंमत, दर्जा, तत्परता, सहजता, विश्र्वास, प्रतिष्ठा, कार्यसंस्कृती याबरोबरच; 'ग्राहकांशी असलेले नाते' हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे.
कित्येकदा, कंपनीचे मालक अथवा डायरेक्टर्स, हे समजूतदार, कार्यतत्पर व संवाद_कुशल असतात. पण ग्राहकांशी थेट संपर्कात येणारा कामगार अथवा कर्मचारी वा कित्येकदा व्यवस्थापक, हा सेवा पुरवण्यात कुचराई करणारा असेल व चूक कबूल न करता, कारणांच्या नावाखाली बहाणे देत वाद घालणारा असेल. तर मग, उत्पादन वा सेवेचा दर्जा कितीही चांगला असेल तरीही ग्राहक हळूहळू दूर होण्याची शक्यता वाढते.
तुम्ही तुमच्या कुटुंबियांसमवेत, एखाद्या चांगल्या रेस्टॉरंट मध्ये जेवणासाठी गेलात. समोर अत्यंत चांगली सजावट व आसनव्यवस्था आहे. खाद्यपदार्थांचा मस्त सुगंध येत आहे. मंद आवाजात छानसे गाणे वाजते आहे. पण तुम्ही रेस्टॉरंट मध्ये प्रवेश केल्यापासून कुणी तुमच्याकडे लक्ष देत नाही. शेवटी तुम्ही मॅनेजरला विनंती केल्यावर, तुम्हाला कोपऱ्यातील एका टेबलाकडे बसण्यासाठी पाठवले जाते. खुर्चीवर बसल्यानंतर सुद्धा, खूप वेळ कुणी तुमची अॉर्डर घ्यायला येत नाही. तुम्ही बोलावल्यावर तुसडेपणाने तुमची ऑर्डर घेतली जात आहे. तुम्ही काय कराल?
रेस्टॉरंट हे एक सहज नजरेसमोर येणारे उदाहरण झाले. कोणत्याही व्यवसायात ग्राहकाला आवश्यक महत्त्व नाकारले तर ग्राहक दूर होऊ शकतो.
मोनोपोली असेल तर, ग्राहक नाखुशीने उत्पादन वा सेवा विकत घेईल. पण ज्याक्षणी चांगला पर्याय समोर येईल, तो तिथे जाईल.
व्यवसायातील कामगार, कर्मचारी व व्यवस्थापक, ग्राहकांशी ज्या पद्धतीने वागतात, त्यावर त्या उत्पादन वा विशेषतः सेवेला रिपीट कस्टमर्स मिळतात. कर्मचारी मैत्रीपूर्ण, ज्ञानी आणि प्रतिसाद देण्यास तत्पर असतील. ते ग्राहकांची काळजी घेण्यासाठी तेथे असतील, तर, ग्राहक त्यांची काळजी घेतात ... त्यांच्याबरोबर व्यवसाय करून.
तेव्हा, आपल्या उत्पादन वा सेवेच्या गुणवत्तेची जितकी काळजी घेता (घ्यायला हवी), तितकीच काळजी ग्राहकांची सुद्धा घ्या!
आपला,
बिपिन मयेकर
बिझनेस कोच
तुमची प्रगती हाच माझा व्यवसाय!
१. कॉर्पोरेट ट्रेनर: १५० हून अधिक मान्यताप्राप्त कंपनीजचा प्रशिक्षण सल्लागार (L&T, Godrej, Mahindra and Mahindra, SOLVAY, IPCA, The Oberoi Hotels and Resorts इत्यादि)
२. आजतागायत ४००० हून अधिक प्रशिक्षण कार्यक्रमांचा अनुभव
(मुंबई पोलीस दलासाठी मोफत प्रशिक्षण)
३. भारतातील प्रथम व जगात तिसऱ्या क्रमांकाची निवड: NLP GOLD MASTER TRAINER; National Federation of Neuro Linguistic Programming, USA
४. मानवी स्वभाव व संवादाचे विश्लेषण करणारे लेखक: आतापर्यंत प्रकाशित झालेली ५ पुस्तके:
१. चला होऊ या प्रसन्न (प्रसन्न प्रकाशन)
२. दॅट्स लाईफ (मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)
३. दिशा यशाची (मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)
४. मी मुंबईकर (पल्लवी फाऊंडेशन)
५. ट्रिटमेंट संवादाची (मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)
४. राजकीय सल्लागार व पर्सनल मेंटर म्हणून प्रभावीरित्या कार्यरत


Comments
Post a Comment