स्वत:च्या वागण्याचे समर्थन किंवा विश्लेषण?
असे होते काय तुमच्या बाबतीत?
तुम्हाला ज्या व्यक्तीचे वागणे पटत नाही, त्या व्यक्तीला मात्र, स्वत:चे वागणे बरोबर वाटत असते.
असे स्वत:च्या बाबतीत सुद्धा होऊ शकते.
जेव्हा एखादी व्यक्ती स्वत:च्या वागण्याचे फक्त आणि फक्त समर्थन करते, व स्वत:चे अजिबात विश्लेषण करत नाही, तेव्हा अशी व्यक्ती एकतर स्वत:ला सतत सहानुभूती देत राहते, किंवा समोरच्या व्यक्तीच्या चुका शोधत राहते; वा दोन्ही करत राहते.
सासू_सून, सासू_जावई, आई-वडील_मुले, पती_पत्नी, भाऊ_भाऊ/बहीण, मित्र_मित्र/मैत्रीण असे वा इतर नाते, यात अशा विश्लेषण न करता, केवळ स्व:समर्थन करणाऱ्या व्यक्तीचा समावेश असेल तर त्या नात्यात काय घडत असेल?
आणि नात्यातील दोघांनाही 'माझेच बरोबर' करायची सवय असेल तर चित्र उभे करा, काय महाभारत घडू शकत असेल?
एकतर अश्या नात्यांमध्ये वादविवाद घडत राहतात किंवा ही नाती अलिप्त होतात.
सतत स्वत:चेच समर्थन करणाऱ्या व्यक्तीचे शक्यतो कुणाशीही पटत नाही, घरी, अॉफिसमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये, शेजाऱ्यांशी! कारण समोरच्या व्यक्तीची बाजू समजून घेण्याची व स्वत:ची बाजू तपासण्याची यांची तयारी नसते.
विश्लेषण करण्याची सवय असेल, तर स्वत:च्या चुका ओळखता येतात. त्याला तारतम्याची जोड असेल तर स्वत:च्या चुका दुरुस्त करता येतात.
काही वेळा, आपण आपल्याच माणसांवर रागावून बडबडतो, पण काही वेळानंतर लक्षात येते की की चूक आपली पण होती. अशा वेळेस, त्या नात्याशी परत संवाद साधायला तारतम्य, धाडस व समजूतदारपणा लागतो.
यांशिवाय केवळ फायदा लक्षात ठेवून संवाद साधला, तर तो स्वकेंद्रितपणा असेल. आज कित्येक नात्यांमध्ये फक्त वॉट्सअॅपरचा संवाद शिल्लक राहिला आहे.
खरी नाती, राग असला तरी, सक्रिय सहभाग देतात. पण स्व:समर्थनाचा अहंकार, गरज असताना सुद्धा, स्वत:चे महत्व सिद्ध करायला दूर ठेवतो. तारतम्य व समजूतदारपणा, वेळेची गरज ओळखतात.
फक्त स्व:समर्थन करणाऱ्या व्यक्तींबरोबर समजूतदारपणा दाखवताना एक काळजी घ्यावी लागते: अतिसमजूतदारपणा दाखवल्याने यांचे स्व: समर्थन अजून पक्के होत जाण्याची शक्यता असते. यांच्यात मग स्वत:चेच खरे करण्याची वृत्ती बळावते. कधी गोड बोलून, तर कधी कल्पकतेने, तर कधी योग्य ठामपणाने अति_स्व:समर्थन करणाऱ्या व्यक्तीला, त्याची चूक लक्षात आणून द्या.
चला, सुरुवात स्वत: पासून करु या. ज्या नात्यामध्ये आपण समोरच्याला दोष देत आहोत, त्या नात्यात आपले काय चुकले आहे; याचा परखड शोध घेऊ या!
एकाच व्यक्तीमध्ये, अहंकाराने लिप्त दुर्योधन असू शकतो, गोंधळलेला अर्जुन असू शकतो, दाता तरीही अन्याय्याला साथ देणारा कर्ण असू शकतो.. आवश्यकता असते ती फक्त स्वत:मधील श्रीकृष्ण कणभर तरी जागा करण्याची! अलिप्त राहून विश्लेषण करण्याची!
आपलाच,
बिपिन मयेकर

Comments
Post a Comment