Posts

संवाद साधा. सत्य परिस्थिती जाणून घ्या!

Image
तो कारमध्ये बाजूलाच बसला. कपाळावर आठ्या पडल्या होत्या. नजर चुकवत होता. माझा खास मित्र होता, म्हणून मी चपापलो. मुंबई विद्यापीठाच्या हिरव्यागार वातावरणात, नुकतंच प्रसन्न एनएलपीचे पहिल्या दिवसाचे ट्रेनिंग सेशन आटोपून निघालो होतो. आज खूश होतो, कारण माझा खास मित्र प्रसन्न एनएलपीच्या कोर्ससाठी आला होता. सकाळी सगळ्या प्रशिक्षणार्थींची ओळखपाळख झाली. सर्वांबरोबर मित्राचा चेहरा उत्सुकतेने भरला होता. लंचपर्यंत तो आनंदाने सहभागी होत होता, पण लंचनंतर तो थोडा मागे कलला होता. आणि आता गाडीत बसल्यावर वर नमूद केलेला प्रकार! "काय झालंय?" असे विचारताच तो तुटून पडला.  "अरे, मित्र ना तू? मग शिकवताना माझ्या घरातले संदर्भ कशासाठी? तू देत असलेली बहुतेक उदाहरणे माझ्या घरातील व्यक्तींची होती. कशासाठी?" जोरात व सलग बोलण्यामुळे त्याला खोकला उचलला. मी पाण्याची बाटली पुढे करत त्याला विचारले, मला सांग, मी कुणाचे नाव घेतले होते काय? नाही ना!" त्याने नकारार्थी मान हलवली. मी समजावले, "मी एकाच कुटुंबातील उदाहरणे दिली तर इतर प्रशिक्षणार्थी त्याबरोबर कसे कनेक्ट होणार? मला ते व्यवसायाच्या अनुषं...

ईर्षा किंवा आत्मसन्मान

Image
प्रिय मित्रमैत्रिणींनो,  नमस्कार! न्यूनगंड व गर्व असणारी माणसं ईर्षा करतात. नकळतपणे, अंतर्मनात स्वतःला कमी लेखले जाते व समोरील माणसाच्या सामाजिक, आर्थिक वा व्यावसायिक कर्तृत्वाला वा योग्यतेला कमी लेखण्याचा प्रयत्न सुरु होऊ शकतो. तुलना सुरु झाल्यामुळे, ईर्षा उत्पन्न होते. मूलभूत स्वत:वर व स्वकतृत्वावर, ठाम विश्वास असेल तर माणूस ईर्षेच्या मार्गावर जात नाही. एकतर समोरील माणसाच्या योग्यतेची, स्थितीची वा कर्तबगारीची स्तुती करतो, वा समोरील माणूस उद्दाम असेल तर दुर्लक्ष करतो. निवड आपली असते.... बिपिन मयेकर वैयक्तिक मार्गदर्शक तुमची प्रगती हाच माझा व्यवसाय

मन मोकळे करणे व विश्र्वास

Image
नमस्कार !  जुन्या मित्राचा फोन आला होता. तो सांगत होता की ग्रुपमध्ये प्रचंड गोंधळ सुरू आहे. काही जण जे  वैयक्तिक चर्चांमध्ये जे ऐ कतात, ते इतरांना जाऊन सांगतात. त्यामुळे गैैैरसमज वाढत चालले आहेत. जेव्हा एखादा माणूस तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि तुमच्याकडे आपलं मन मोकळं करतो तेव्हा तुमची जबाबदारी वाढते. १. तो तुमच्याशी बोलताना काही चुका करत असेल तर शांतपणे व कल्पकतेने त्या चुका त्यालाच सांगा, पण इतरांना नको. २. समोरचा माणूस रागारागाने आपलं मन मोकळं करत असेल तर तो चुकू शकतो, तसेच भावनेच्या भरात तो काहीबाही व्यक्त करु शकतो. आपण मात्र काळजी घ्यायला हवी.  अशा माणसाला उद्युक्त करण्याच्या ऐवजी, त्याला शांत करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अन्यथा आपण समोरच्या माणसाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो. ३. जेव्हा एखादा माणूस शांत व समंजसपणे आपली व्यथा तुमच्याकडे व्यक्त करतो, तेव्हा ती व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न करा. पण कोणत्याही परिस्थितीत, त्या व्यथेचा, कळत किंवा नकळत फायदा घेण्याचा प्रयत्न अजिबात करु नका. ४. तुमच्याजवळ आपलं मन मोकळं करणारा माणूस तुमच्याशी व त्या क्षणांशी प्रामाणिक ...

HOW TO GET SOMEONE INTERESTED IN TALKING WITH YOU | Using VAK technique

Image

पालकत्व

Image
मुलांच्या भविष्यकाळातील आठवणींमध्ये स्थान हवे असेल तर त्यांच्या आजच्या क्षणांमध्ये सहभागी व्हायला हवे. आईवडिलांचा वर्तमानकाळ समजावून घेण्यासाठी, मुलांना त्यांच्या भूतकाळात डोकावून बघावे लागेल. कित्येक वेळेला, आईवडिलांना एका बाजूला आपल्या मुलांचे भविष्य तर दुसऱ्या बाजूला, स्वतःच्या भूतकाळातील चुका दिसत असतात. स्वतःच्या भूतकाळातील त्याच चुका, आपल्या मुलांनी वर्तमानकाळात करु नये, अशी तळमळ असते. बहुतेक वेळा, हेतू चांगलाच असतो पण पद्धत चुकते. तर कधी कधी, एखाद्याच्या (मुलांच्या किंवा आई/वडिलांच्या) समजूतदारपणाला गृहित धरले जाऊ शकते. आईवडिल/मुले; दोघांनीही वर्तमानकाळात, हेकटपणा न करता वा भावनांच्या आहारी न जाता, *योग्य भविष्यकाळ* यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे. ~ बिपीन मयेकर

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

Image
यावर एका मित्राने विचारले, "तारतम्य म्हणजे फक्त एव्हढेच काय?" मला सांगावे लागले, "अरे, हे फक्त संवादातील एका कोनावर आधारित आहे. पण तरीही यातील गाभा तारतम्याच्या व्याख्येला लागू होतो. तो म्हणजे स्वत:च्या क्षमता व मर्यादा यांची योग्य जाणीव!" कुठे व किती पुढे व्हायचे आणि कुठे व किती वेळ थांबायचे; हे नोकरी/व्यवसाय असो वा नातेसंबंध; राजकारण असो वा छंद; हे उमगले_समजले की एक तर प्रगती होते व परिस्थिती विपरित असेल तर अधोगती होत नाही. श्री. अमिताभ बच्चन यांनी हिरोचे रोल करताना, अनेक जबरदस्त सुपरहिट चित्रपट दिले होते. पण नंतर त्यांचे वय वाढू लागले, तरीही हिरोचे चित्रपट करणे सुरु होते. परिणामी चित्रपट फ्लॉप होऊ लागले. त्यांनी पॉझ घेऊन, हळूहळू चरित्र भूमिकांकडे रोख वळवला. आणि त्यात त्यांना प्रचंड यश मिळू लागले. त्यांच्या समकालीन नायकांना त्यांच्याइतके यश मिळालेले नाही. नोकरी करणाऱ्या, अनेक जणांनी थांबून विचारपूर्वक नियोजन करुन व्यवसाय सुरु करुन प्रचंड यश मिळवले आहे. पण काही जणांनी, 'उद्योजक व्हायचं आहे' या भरात, अतिउत्साहाने आपली निवृत्तीनंतरची सर्व रक्कम अर...

करु ना, पुन्हा सुरुवात!

Image
नेहमीचा प्रश्न, "जगताय ना?" किडेमुंग्या व प्राणीपक्षी फक्त जिवंत राहण्यासाठी धडपड करतात, तर मनुष्य 'आयुष्य' अर्थपूर्ण जगून सार्थकी लावू शकतो. पण आज त्याअगोदर, 'जिवंत' राहण्याची कसरत करावी लागते आहे. निसर्गाने परत आपली ताकद दाखवून दिली आहे. एका विषाणूने सर्व जगाला बंदिस्त करुन टाकले आहे. या आवश्यक बंदिस्तपणाला प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने सामोरा जात आहे. काही अशिक्षित लोकांना अज्ञानामुळे व परिस्थितीमुळे गिचमिडीत राहणाऱ्यांना, रोगाला आमंत्रण द्यावे लागले आहे. तर काही सुशिक्षित पण असंस्कृत माणसांच्या अतिआत्मविश्वासामुळे, समाजाला धोका निर्माण झाला आहे. आज आपल्यासाठी बाहेर पडलेल्या पोलीसांना, वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींना, सफाई कामगारांना रोग ग्रासतो आहे. काही जण बळी पडले आहेत. निदान त्यांच्या हौतात्म्याचा व त्यांच्या कुटुंबियावर झालेल्या आघाताचा आदर करुन तरी या शायनिंग शूरवीरांनी काळजी घ्यायला हवी. आपण सर्वांनी त्या हुतात्म्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण करायला हवी. आपण ज्यांनी हा सावधपणा, स्वसंर‌क्षणार्थ मान्य केला आहे, त्यांचा आता वर्तमानकाळ कसा ...