ईर्षा किंवा आत्मसन्मान

प्रिय मित्रमैत्रिणींनो, 

नमस्कार!

न्यूनगंड व गर्व असणारी माणसं ईर्षा करतात. नकळतपणे, अंतर्मनात स्वतःला कमी लेखले जाते व समोरील माणसाच्या सामाजिक, आर्थिक वा व्यावसायिक कर्तृत्वाला वा योग्यतेला कमी लेखण्याचा प्रयत्न सुरु होऊ शकतो.

तुलना सुरु झाल्यामुळे, ईर्षा उत्पन्न होते. मूलभूत स्वत:वर व स्वकतृत्वावर, ठाम विश्वास असेल तर माणूस ईर्षेच्या मार्गावर जात नाही.

एकतर समोरील माणसाच्या योग्यतेची, स्थितीची वा कर्तबगारीची स्तुती करतो, वा समोरील माणूस उद्दाम असेल तर दुर्लक्ष करतो.

निवड आपली असते....

बिपिन मयेकर

वैयक्तिक मार्गदर्शक

तुमची प्रगती हाच माझा व्यवसाय








Comments

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?