तुम्हाला प्रश्न पडतात काय?

You never meet the same man again.

भगवान गौतम बुद्ध: "ते झाड होत आहे."
हे वाक्य पूर्ण व्हायच्या आत, झाडाची काही पाने गळून पडली असतील, नवीन कोंब वा पालवी फुटण्याची प्रक्रिया काकणभर का होईना सुरु झाली असेल, मुळे जमिनीत किंचित सरकली असतील.

क्षणाक्षणाला बदल घडत आहे.

वपुंच्या शब्दांत थोडी , जगण्यावर तुटून प्रेम केले की जिज्ञासा जिवंत राहते. 'कशामुळे?' व 'कशासाठी?' असे प्रश्न पडत राहतात. जगण्याचे महोत्सवात रुपांतर होते.

सामान्य माणसाला जगण्यापलिकडचे प्रश्न पडत नाहीत किंबहुना आवडत नाहीत.

तुम्ही प्रश्न निर्माण करता काय?

कोणता प्रश्न माणसामध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो?

दररोज सकाळी व रात्री झोपताना कोणते दोन प्रश्न, तुमचे आयुष्य आमूलाग्र बदलू शकतात?

माझे दोन प्रश्न:

सकाळी:
माझा आजचा दिवस, प्राणीपक्षांप्रमाणे निव्वळ जिवंत राहण्यापेक्षा, मनुष्य म्हणून सार्थकी लावण्यासाठी कोणत्या पाच गोष्टी, मी.करायलाच हव्यात?

रात्री झोपण्यापूर्वी:
माझा आजचा दिवस, प्राणीपक्षांप्रमाणे निव्वळ जिवंत राहण्यापेक्षा, मनुष्य म्हणून सार्थकी लावण्यासाठी कोणत्या प्रमुख तीन गोष्टी, मी केल्या आहेत?

Comments

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?