नात्यांचा मुरांबा
'मुरांबा' चित्रपटातील 'देशमुख' या सुखवस्तु कुटुंबातील व्यक्तिरेखा आवडल्या कारण यातील कुणीच जरा जास्त आततायीपणा करत नाही.
मला चित्रपटाचे विश्लेषण करावयाचे नाही, तर या चित्रपटातून मी काय शिकायला हवे, ते नमूद करतो आहे.
चित्रपटात जरी त्यांच्या आयुष्यातील इतर आव्हाने दाखवली नसली, तरी तरुण मुलाच्या आयुष्यात चाललेला गोंधळ (ब्रेकअपचा प्रश्न) व त्यात प्रखरतेने दिसत असलेला कुटुंबातील प्रत्येक व्यक्तिरेखेचा स्वभाव मला भावला.
आई:
कुटुंबापुरते तिचे जग आहे.
कुटुंबावर अर्थात पतीवर, मुलावर आणि हो, मुलाच्या विशेष मैत्रिणीवर, ती प्रचंड प्रेम करते, तरीही त्यातून ती कुटुंबाला वेठीस धरत नाही. आपल्या प्रेमाचे प्रदर्शन करत नाही. सतत, 'मी मेलीने एकटीने किती राबायचे..' वगैरे पालुपदे तिच्याकडे नाही आहेत.
मला शिकायला आवडेल:
एका क्षणी, मुलगा नकळत तिची शैक्षणिक पार्श्वभूमी काढतो, तेव्हा तिला वाईट वाटते. पण ती ते धरुन बसत नाही. आततायीपणा करत नाही.
वडील, मुलाला आईच्या बदलत्या काळानुसार, बदल स्विकारण्याच्या मनोवृत्तीबद्दल समजावतात. पुढच्या क्षणी, बाजारात जाण्यापूर्वी मुलगा सवयीप्रमाणे तिच्या पर्समधून पैसे काढतो व आईला समोर पाहून खजील होतो. पण ती सहज हसून त्याला संमती देते.
कित्येकदा जवळील एखादी व्यक्ती, रागाच्या भरात, आपला अपमान करते. पण मग आपल्या अहंकाराच्या भिंती इतक्या मोठ्या होतात की नाते दिसेनासे होत जाते?
आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती रागाच्या भरात काहीबाही बोलून जात आहे. ते तात्कालिक आहे.हे समजून घेता येते काय? जर त्या व्यक्तीचे प्रेम व तात्कालिक राग तराजूत ठेवले तर तराजू कोणत्या बाजूला झुकेल?
मुलगा:
वरुन बेफिकीरपणा दाखवणारा पण आतून अपयशाला घाबरणारा
भावी सून:
प्रगतशील व आवश्यक व्यावहारिक विचारांची मुलगी
वडील:
शांत, समजूतदार, कल्पक, पुढाकार घेणारे व संवाद कौशल्याचा सुयोग्य वापर करणारे!

Comments
Post a Comment