मन मोकळे करणे व विश्र्वास
नमस्कार!
जुन्या मित्राचा फोन आला होता. तो सांगत होता की ग्रुपमध्ये प्रचंड गोंधळ सुरू आहे. काही जण जे वैयक्तिक चर्चांमध्ये जे ऐकतात, ते इतरांना जाऊन सांगतात. त्यामुळे गैैैरसमज वाढत चालले आहेत.
जेव्हा एखादा माणूस तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि तुमच्याकडे आपलं मन मोकळं करतो तेव्हा तुमची जबाबदारी वाढते.
१. तो तुमच्याशी बोलताना काही चुका करत असेल तर शांतपणे व कल्पकतेने त्या चुका त्यालाच सांगा, पण इतरांना नको.
२. समोरचा माणूस रागारागाने आपलं मन मोकळं करत असेल तर तो चुकू शकतो, तसेच भावनेच्या भरात तो काहीबाही व्यक्त करु शकतो. आपण मात्र काळजी घ्यायला हवी.
अशा माणसाला उद्युक्त करण्याच्या ऐवजी, त्याला शांत करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अन्यथा आपण समोरच्या माणसाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो.
३. जेव्हा एखादा माणूस शांत व समंजसपणे आपली व्यथा तुमच्याकडे व्यक्त करतो, तेव्हा ती व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न करा.
पण कोणत्याही परिस्थितीत, त्या व्यथेचा, कळत किंवा नकळत फायदा घेण्याचा प्रयत्न अजिबात करु नका.
४. तुमच्याजवळ आपलं मन मोकळं करणारा माणूस तुमच्याशी व त्या क्षणांशी प्रामाणिक असतो.
तुम्हीसुद्धा त्या व्यक्तीच्या अपरोक्ष, त्या व्यक्तीच्या विश्वासाबरोबर प्रामाणिक असणं आवश्यक आहे. अन्यथा विश्वासाला तडा जाऊ शकतो.
'हो'ला होयबा करणारे किंवा इमोजीच्या भाषेत सोशल मिडियावर बोलणारे खूप असतात. पण मनाशी भाषा समजणारे फार क्वचित असतात, त्यांना जोडून ठेवा.
सध्याच्या युगात पैसा मिळू शकतो, पण ऐकून घेणारा माणूस मिळणं कठीण आहे आणि समजून घेणारा माणूस मिळणे तर दुर्मिळ आहे.
अशा नात्यांशी घट्ट नाळ जोडून ठेवू या. आपण सुद्धा समजून घेण्यावर भर देऊ या.
तुम्ही समोरच्याला योग्य रितीने समजून घ्यायला सुरुवात केलीत, तर तुम्ही माणसं जोडत जाल.
आपलाच,
बिपिन मयेकर
तुमची प्रगती हाच माझा व्यवसाय
वॉट्सॲप नंबर ७०२१५०८४७०


खूपच मार्गदर्शक 🔉✅✔️
ReplyDeleteधन्यवाद!
Delete