विद्यार्थी दशा व दिशा

विद्यार्थी: दशा व दिशा


'विद्यार्थी' शब्दाचा अर्थ विद्या मिळवण्यासाठी प्रयत्न करणारा असा होतो. मी या इथे व पुढे जरी पुरुषवाचक शब्द वापरला तरी तो शब्द, विद्यार्थी मुलगा व मुलगी, अशा दोघांनाही लागू असेल. या लेखातून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. ठराविक व विशेष कामगिरी नेमून देणार आहे. 'प्रसन्न' या आमच्या प्रशिक्षण संस्थेत आम्ही लहान मोठी अशा दोन्ही व्यक्तींना एक शिकवण सुरुवातीस दिली जाते ती म्हणजे - 'कोणतेही कार्य सुरु करण्यापूर्वी, तुम्हाला त्याचा हेतू व परिणाम माहीत असावयास हवा.'


विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, चला, मग या प्रथम कामगिरीला सुरुवात करा:

तुम्ही कशासाठी शिकत आहात व तुमच्या शिकण्यामुळे तुमच्या आयुष्यात काय काय चांगले परिणाम होणार आहेत? याचे चित्र मनात तयार करा व त्यावर तुमचा लेखी अहवाल तयार करुन शिक्षक व पालकांबरोबर चर्चा करा.


एखाद्या विद्यार्थ्याला तो कशासाठी शिकत आहेत व त्याला शिक्षणातून काय साध्य करायचे; याची कल्पना नसेल तर अशा विद्यार्थ्याचे अभ्यासात कसे लक्ष लागेल? याऊलट ज्या विद्यार्थ्याकडे 'त्याला आयुष्यात काय बनायचे आहे', हे ध्येय तयार असते व या वर्षीच्या, नियमित व वार्षिक परीक्षेत, किती टक्के मिळवायचे आहेत, हे माहीत असते; तो विद्यार्थी अभ्यासात लक्ष घालतो.


तुमचा अहवाल तयार झाला की आवश्यकता असेल ती जे तुम्हाला शिकून मिळवायचे आहे, त्यासाठी सिद्ध होण्याची....

सर्वात प्रथम आवश्यकता असते ती स्वतः चे योग्य आत्मविश्लेषण करण्याची!
एक विद्यार्थी म्हणून तुमच्या मध्ये कोणकोणते गुण आहेत?
उदाहरण म्हणजे महत्वाकांक्षा, जिद्द, एकाग्रता, संयम, उत्साह, इत्यादी.
एक विद्यार्थी म्हणून तुमच्यामध्ये कोणकोणते दोष आहेत?
उदाहरण म्हणजे आळस, राग, धरसोडपणा, बेफिकिरी, इत्यादी.
आता विचार करा की तुमच्यामधील दोषांमुळे तुमचे कोणते नुकसान होत आहे व तुम्हाला भविष्यात कोणता त्रास होऊ शकतो?
तुमच्याकडे असलेल्या गुणांचा तुम्हाला काय फायदा होतो आहे व भविष्यात कोणकोणते फायदे होऊ शकतात?

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे तुमचे प्रेरणास्रोत कोण आहेत?
बिजनेसमन, उच्चस्तरावरील व्यवस्थापक/प्रशासक,खेळाडू की चित्रपटातील कलाकार?
चित्रपटातील कलाकार प्रेरणास्थान असावयास हरकत नाही पण फक्त रंग, रुप व पेहराव यांना भुलून तुम्ही एखाद्या कलाकाराला आदर्श मानाल तर गल्लत होऊ शकते.
तुम्ही ज्या व्यक्तीला आदर्श मानता, त्या आदर्श व्यक्तीने कोणते व कशा प्रकारचे प्रयत्न केले म्हणून यश मिळाले, याचा मागोवा घ्यावा. त्याच मार्गावर चालत, परिस्थितीनुसार आवश्यक बदल करत, तुम्ही त्याच प्रकारचे यश मिळवू शकता.

तुमच्या कुटुंबात व सभोवताली, अडचणी असू शकतात. पण तिथे आवश्यकता आहे ती, सकारात्मक दृष्टिकोन ठेवत चिकाटीने प्रयत्न करत राहण्याची!
अनेक शास्त्रज्ञांनी व यशस्वी व्यक्तींनी आपले लहानपण गरिबीत घालवले होते.


आगामी ब्लॉग्स:

स्मरणशक्ती

वेळेचे नियोजन

ताणतणाव नियोजन

कल्पकता

कृतज्ञता 

Comments



  1. Basically, *Goal is the mean towards outcome!*

    But even parents also only focus on ONLY percentage in examination and not other skills set.

    If one analyses
    *capacity and consequences* before the decision, then many career and even marriages will have positive results.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ही कोण?

तारतम्य म्हणजे काय रे भाऊ?

परीसाचा दगड मिळाला काय?