विद्यार्थी: दशा व दिशा 'विद्यार्थी' शब्दाचा अर्थ विद्या मिळवण्यासाठी प्रयत्न करणारा असा होतो. मी या इथे व पुढे जरी पुरुषवाचक शब्द वापरला तरी तो शब्द, विद्यार्थी मुलगा व मुलगी, अशा दोघांनाही लागू असेल. या लेखातून मी तुमच्याशी संवाद साधणार आहे. ठराविक व विशेष कामगिरी नेमून देणार आहे. 'प्रसन्न' या आमच्या प्रशिक्षण संस्थेत आम्ही लहान मोठी अशा दोन्ही व्यक्तींना एक शिकवण सुरुवातीस दिली जाते ती म्हणजे - 'कोणतेही कार्य सुरु करण्यापूर्वी, तुम्हाला त्याचा हेतू व परिणाम माहीत असावयास हवा.' विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, चला, मग या प्रथम कामगिरीला सुरुवात करा: तुम्ही कशासाठी शिकत आहात व तुमच्या शिकण्यामुळे तुमच्या आयुष्यात काय काय चांगले परिणाम होणार आहेत? याचे चित्र मनात तयार करा व त्यावर तुमचा लेखी अहवाल तयार करुन शिक्षक व पालकांबरोबर चर्चा करा. एखाद्या विद्यार्थ्याला तो कशासाठी शिकत आहेत व त्याला शिक्षणातून काय साध्य करायचे; याची कल्पना नसेल तर अशा विद्यार्थ्याचे अभ्यासात कसे लक्ष लागेल? याऊलट ज्या विद्यार्थ्याकडे 'त्याला आयुष्यात काय बनायचे आहे', हे ध्...
यावर एका मित्राने विचारले, "तारतम्य म्हणजे फक्त एव्हढेच काय?" मला सांगावे लागले, "अरे, हे फक्त संवादातील एका कोनावर आधारित आहे. पण तरीही यातील गाभा तारतम्याच्या व्याख्येला लागू होतो. तो म्हणजे स्वत:च्या क्षमता व मर्यादा यांची योग्य जाणीव!" कुठे व किती पुढे व्हायचे आणि कुठे व किती वेळ थांबायचे; हे नोकरी/व्यवसाय असो वा नातेसंबंध; राजकारण असो वा छंद; हे उमगले_समजले की एक तर प्रगती होते व परिस्थिती विपरित असेल तर अधोगती होत नाही. श्री. अमिताभ बच्चन यांनी हिरोचे रोल करताना, अनेक जबरदस्त सुपरहिट चित्रपट दिले होते. पण नंतर त्यांचे वय वाढू लागले, तरीही हिरोचे चित्रपट करणे सुरु होते. परिणामी चित्रपट फ्लॉप होऊ लागले. त्यांनी पॉझ घेऊन, हळूहळू चरित्र भूमिकांकडे रोख वळवला. आणि त्यात त्यांना प्रचंड यश मिळू लागले. त्यांच्या समकालीन नायकांना त्यांच्याइतके यश मिळालेले नाही. नोकरी करणाऱ्या, अनेक जणांनी थांबून विचारपूर्वक नियोजन करुन व्यवसाय सुरु करुन प्रचंड यश मिळवले आहे. पण काही जणांनी, 'उद्योजक व्हायचं आहे' या भरात, अतिउत्साहाने आपली निवृत्तीनंतरची सर्व रक्कम अर...
नमस्कार ! जुन्या मित्राचा फोन आला होता. तो सांगत होता की ग्रुपमध्ये प्रचंड गोंधळ सुरू आहे. काही जण जे वैयक्तिक चर्चांमध्ये जे ऐ कतात, ते इतरांना जाऊन सांगतात. त्यामुळे गैैैरसमज वाढत चालले आहेत. जेव्हा एखादा माणूस तुमच्यावर विश्वास ठेवतो आणि तुमच्याकडे आपलं मन मोकळं करतो तेव्हा तुमची जबाबदारी वाढते. १. तो तुमच्याशी बोलताना काही चुका करत असेल तर शांतपणे व कल्पकतेने त्या चुका त्यालाच सांगा, पण इतरांना नको. २. समोरचा माणूस रागारागाने आपलं मन मोकळं करत असेल तर तो चुकू शकतो, तसेच भावनेच्या भरात तो काहीबाही व्यक्त करु शकतो. आपण मात्र काळजी घ्यायला हवी. अशा माणसाला उद्युक्त करण्याच्या ऐवजी, त्याला शांत करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अन्यथा आपण समोरच्या माणसाला चुकीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकतो. ३. जेव्हा एखादा माणूस शांत व समंजसपणे आपली व्यथा तुमच्याकडे व्यक्त करतो, तेव्हा ती व्यथा समजून घेण्याचा प्रयत्न करा. पण कोणत्याही परिस्थितीत, त्या व्यथेचा, कळत किंवा नकळत फायदा घेण्याचा प्रयत्न अजिबात करु नका. ४. तुमच्याजवळ आपलं मन मोकळं करणारा माणूस तुमच्याशी व त्या क्षणांशी प्रामाणिक ...
Comments
Post a Comment